विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोना विस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवता येईल आणि ठिकठिकाणी विद्युत शवदाहिन्या उभारता येतील, यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. covid 19 task force meeting, discussion on many issues
या बैठकीत फक्त टास्क फोर्सचे सदस्य होते. यात महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली. ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे राजेश टोपे म्हणाले.
लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट जिथे आहेत तिथून आपण सिलेंडर भरुन आणतो. त्या सिलेंडरला ट्यूबच्या माध्यमातून देतो. मात्र, आता ज्या पद्धतीने संख्या आहे त्यानुसार ही पद्धत बंद करावी, हा मुद्दा मांडला. लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट प्रत्येक जिल्ह्यात उभारायचा निर्णय घेण्यात आला. हा प्लॅन्ट उभारल्यानंतर १० ते १५ दिवसांचा ऑक्सिजन साठवता येऊ शकतो. त्यामुळे दररोज पळापळ होणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने बैठक घेणार आहेत. त्यात तातडीने निर्णय होईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारच्या ठिकाणी गर्दी होते. ही गर्दी होऊ नये यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
रेमडेसिवीर जपून वापरण्याबाबत चर्चा
रेमडेसिवीरबाबत चर्चा झाली. हे इंजेक्शन आणखी १० – १५ दिवस काळजीपूर्वक वापरले पाहिजे. कारण त्यानंतर आपल्याला चांगला साठा मिळेल. अनावश्यक वापरण्यावर कारवाई करण्याबाबतही चर्चा झाली. रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्याचा निर्णय झाला आहे.
covid 19 task force meeting, discussion on many issues