• Download App
    पुण्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर ? ; व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांची धावाधाव|Corona's condition out of hand in Pune Patient rush for ventilator beds

    पुण्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर ? ; व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांची धावाधाव

    वृत्तसंस्था

    पुणे : कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुण्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या पाहता, हॉस्पिटल हाऊस फुल्ल होण्याची दाट शक्यता आहे.Corona’s condition out of hand in Pune Patient rush for ventilator beds

    आयसीयू आणि व्हेंटिलटेर बेडच्या (ICU and ventilator beds) बाबतीत तर पुण्यात संकटाला सुरुवातही झाली आहे. कारण सोमवारी सायंकाळी पुणे पालिका हद्दीत एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नव्हता.



    कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यात 21 हजारांहून अधिक बेड दिले आहेत. पण यापैकी व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्या 489 आहे. सोमवारी सायंकाळी यापैकी एकही बेड शिल्लक नव्हता. रात्री उशिरानंतर यापैकी काही बेड उपलब्ध झाले. पण ते फुल व्हायला सुरुवात झाली आहे.

    आयसीयू बेडचा विचार करता. पुण्यात पालिका आणि खासगी रुग्णालयात मिळून एकूण 430 आयसीयू बेड आहेत. त्यापैकी सोमवारी रात्री केवळ 2 उपलब्ध होते. व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची पुणे महानगर विभागातील रुग्णालयात उपलब्ध होते.

    सोमवारी या रुग्णालयांमध्ये 90 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होते. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व खासगी रुग्णालयांमध्ये 23 पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथकं गरजू रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी काम करतात.

    मागची आणि आजची परिस्थिती जैसे थेच !

    पुणे महापालिका आणखी 1000 बेडची व्यवस्था करण्याच्या तयारीत असून त्यापैकी 60 आयसीयू बेड असतील. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे तेव्हा जेवढी आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या होती, त्यात अजूनही फारसा बदल झालेला नाही.

    Corona’s condition out of hand in Pune Patient rush for ventilator beds

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!