Corona Vaccine Registration : 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रजिस्ट्रेशनला बुधवारी दुपारी चार वाजेपासून सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयापर्यंत सर्वांना लसीकरणाची मुभा आहे. तथापि, रजिस्ट्रेशनची सुरुवात होताच को-विन सर्व्हर क्रॅश झाले. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी याचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यात cowin.gov.in वेबसाइटही काम करत नसल्याचे दिसत आहे. अनेक युजर्सनी म्हटलंय की, आरोग्य सेतु, उमंग आणि कोविन अॅपही काम करत नाहीये. दुसरीकडे, आरोग्य सेतुच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधित स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यानुसार संध्याकाळी चार वाजता काही काळासाठी छोटी समस्या आली होती, जी आता ठीक झाली असून 18 वर्षांपुढील सर्वांना नोंदणी करता येईल, असे सांगण्यात आले आहे. Corona Vaccine Registration started again after cowin server crashed at 4 pm today, says Arogya setu
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रजिस्ट्रेशनला बुधवारी दुपारी चार वाजेपासून सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयापर्यंत सर्वांना लसीकरणाची मुभा आहे. तथापि, रजिस्ट्रेशनची सुरुवात होताच को-विन सर्व्हर क्रॅश झाले. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी याचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यात cowin.gov.in वेबसाइटही काम करत नसल्याचे दिसत आहे. अनेक युजर्सनी म्हटलंय की, आरोग्य सेतु, उमंग आणि कोविन अॅपही काम करत नाहीये. दुसरीकडे, आरोग्य सेतुच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधित स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यानुसार संध्याकाळी चार वाजता काही काळासाठी छोटी समस्या आली होती, जी आता ठीक झाली असून 18 वर्षांपुढील सर्वांना नोंदणी करता येईल, असे सांगण्यात आले आहे.
आरोग्य सेतूने ट्वीट करून सांगितले की, ”को-विन पोर्टल काम करत आहे. 4 वाजता छोटासा ग्लिच आला होता, जो आता ठीक झाला आहे. 18 वर्षांहून अधिक वयाचे व्यक्ती रजिस्ट्रेशन करू शकतात.” आरोग्य सेतूने ट्वीटमध्ये एक स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे. यात वेबसाइट काम करत असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यादरम्यान कोट्यवधी भारतीयांचे लसीकरण होणार आहे. हे लसीकरण सरकारी आणि खासगी रुग्णालयांत होणार आहे. यूपी, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासहित बहुतांश राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे.
Corona Vaccine Registration started again after cowin server crashed at 4 pm today, says Arogya setu
महत्त्वाच्या बातम्या
- India Fights Back : पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीस पंतप्रधान मोदींची मंजुरी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 18 ते 44 वयापर्यंत मोफत लसीकरणाची घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय
- कोरोनाविरुद्ध येणार फायझरचे ओरल औषध, वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होण्याचा कंपनीचा दावा
- बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक, कोरोनाचे नियम मोडल्याचा आरोप
- परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटवर झाड पडून गळती, कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वाचवले १४ रुग्णांचे प्राण