वृत्तसंस्था
मुंबई – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोविड संसर्ग अधिक पसरण्याचा धोका असून खबरदारी म्हणून मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबईत आठवडाभरात ८५ हजारांहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या. आठवडाभरात अडीच लाख चाचण्या केल्या गेल्या.Corona tests increased in Mumbai
पालिकेने मुंबईत शुक्रवारी ४०,४४३ कोविड चाचण्या केल्या. शनिवारी ४४,६४९ चाचण्या केल्या. दोन दिवसांत ८५ हजार चाचण्या करण्यात आल्या. गेल्या आठवडाभरात २,३४,७५७ चाचण्या झाल्या. त्यापैकी २८२७ जण कोविड बाधित सापडले. बाधित होण्याचा दर १.२० टक्के नोंदवण्यात आला.
कोविडची दुसरी लाट ओसरल्यानंतर दैनंदिन चाचण्यांची संख्याही कमी झाली होती. दैनंदिन ५० हजारांवरील चाचण्यांचा आकडा २५ हजारांच्या आत आला होता. मात्र, सध्या उत्सवाचे वातावरण असल्याने पालिकेकडून खबरदारी घेण्यात येत असून चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.
Corona tests increased in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- Pornographic Case : पॉर्नोग्राफी केसमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जामीन, 19 जुलैपासून होता
- मीटूचा आरोप असलेले चरणजीत मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाहीत, काँग्रेसने त्यांना हटवावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी
- Corona Vaccine : गर्भवती महिला आणि नवजात बालकांवर लसीचा काय परिणाम होतो? सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर
- इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी तालिबानवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, सीरियल बॉम्बस्फोटांचा केला दावा