वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील कोणत्याही शहरातून मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विमान प्रवाशाला कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अर्थात कोरोना चाचणीचा अहवाल ४८ तांसापूर्वीचा असावा, असे बंधन घातले आहे. Corona Test Is Mandatory For Aeroplane Travelers To Enter In Mumbai
प्रयोगशाळेवरील भार कमी करण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या निरोगी व्यक्तीला करोना चाचणी अहवाल बंधनकारक करू नये, अशी सूचना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केली आहे.
मात्र आता बृहन्मुंबई महापालिकेने मुंबई शहरात विमानाने जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल अनिवार्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी ही अट मान्य करता येईल, परंतु, महाराष्ट्रातील लोकांसाठी ही अट जाचक ठरत आहे.
राज्याची राजधानी असल्याने मंत्रालयाशी संबंधित कामे मुंबईत होतात. तसेच प्रमुख कार्पोरेट कार्यालय, शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे मुंबईत नेहमीच ये-जा करावी लागते.
लॉकडाऊनमध्ये विमानाने मुंबई जाणाऱ्यांना १३ मे २०२१ पासून कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवणे आवश्यक आहे. हा अहवाल ४८ तांसापूर्वीपेक्षा अधिक कालावधीचा नसावा, असे बंधनकारक आहे.
Corona Test Is Mandatory For Aeroplane Travelers To Enter In Mumbai
महत्त्वाच्या बातम्या