विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत कोविडचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात चाचण्या आणि आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण एक टक्यांदा वर आले आहे. त्यािमुळे आता कोविडचा पॉझिटीव्हीटी दर एक टक्यां वर आला आहे. फेब्रुवारीत कोविडची दुसरी लाट आल्याटनंतर मध्यावर पॉझिटीव्हीटी दर हा १६.१४ टक्के होता; तर मे २०२० मध्ये सर्वाधिक २७. ६९ टक्के होता. Corona is in control in Mumbai
कोणत्याही आजारात मृत्युदर कमी असणे आवश्यक आहे. पहिल्या लाटेत मार्च महिन्यात मृत्युदर १२.०४ टक्के होता. म्हणजे १०० रुग्णांपैकी १२ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत होता. मे २०२१ मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेवळी मृत्युदर नियंत्रणात होता. त्या वेळी मृत्युदर २.५ टक्के होता. आता हा मृत्युदर २.१ टक्यांया पर्यंत आला आहे. मृत्युदर एक टक्क्याहून खाली आणण्याचे आव्हान आहे.
मुंबईत कोविडच्या् पहिल्याह रुग्णाची नोंद ११ मार्च २०२० मध्ये झाली. सुरुवातीला कोविडची बाधा फक्त परदेशातून आलेल्यांना झाल्या चे आढळत होते. त्याफनंतर उच्च वसाहतींमध्येही कोविडची बाधा होऊ लागली. मे महिन्यात झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोविडचे रुग्ण आढळू लागले होते. त्याझ वेळी कोविडचा पॉझिटीव्हीटी दर २७.६९ टक्यांदर वर पोहचला होता. म्हणजे १०० कोविड चाचण्या झाल्यानंतर त्यात २७.६९ टक्के बाधित आढळत होते.
दुसऱ्या लाटेत दिवसाला ११ हजारपर्यंत रुग्णांची नोंद होत होती. सध्या १०० संशयितांची चाचणी झाल्यावर अवघा एक रुग्ण आढळत आहे; तर दिवसातील रुग्णांचे प्रमाणही २०० ते ३०० मध्ये आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून दररोज सरासरी ३२ ते ३३ हजार चाचण्या होत असल्याळची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्याढत आली आहे.
Corona is in control in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- टोकियोमध्ये पदकांची लयलूट; देवेंद्र झांजरिया, योगेश कथुनिया यांना रौप्य पदक; तर सुंदर सिंगला ब्राँझपदक
- Jai Kanhaiya Lal ki : गोकुळाष्टमी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले ; पहा फोटो
- योगेश काथुनियाला टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये थाळीफेकमध्ये रौप्यपदक ; भारताची आणखी एक चमकदार कामगिरी
- Tokyo Paralympics 2020 : अवनी लेखराने घेतला “सुवर्णवेध”; नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक