• Download App
    गणेशोत्सवानंतर राज्यात कोरोना रुग्णवाढीची भीती, पाच जिल्ह्यांत ७५ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण | Corona increased in some parts of maharashtra

    गणेशोत्सवानंतर राज्यात कोरोना रुग्णवाढीची भीती, पाच जिल्ह्यांत ७५ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण

    वृत्तसंस्था

    मुंबई – गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचा इशारा राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. ओणमनंतर केरळमधील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे उदाहरण देत आताच खबरदारी घेतली नाही तर कोरोना बाधित वाढून परिस्थिती बिकट बनू शकेल, असे मत त्त्यांनी व्यक्त केले आहे. Corona increased in some parts of maharashtra

    सणांदरम्यान नागरिक गर्दी करतात. मास्क घालणे किंवा सामाजिक अंतर राखण्यासारख्या मूलभूत नियमांचे उल्लंघन करतात. परिस्थिती अशीच राहिली तर गणेशोत्सवानंतर राज्यात रुग्ण वाढण्यास पुन्हा सुरुवात होईल, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.



    सध्या केरळनंतर सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ५०,४०० सक्रिय रुग्ण आहेत. त्यांपैकी मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि नगर जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ७५.८५ टक्के एवढ्या सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

    राज्यात रविवारी ३,६२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत महाराष्ट्रातील ६४,९७,८७७ नागरिक कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यभरात ५०,४०० सक्रिय कोविड रुग्ण आहेत. १३,०१८ रुग्णांसह पुणे जिल्ह्याच्या यादीत आघाडीवर आहे. त्यानंतर ठाणे ७,९७९, नगरमध्ये ६,०२७ आणि सातारा ५,६३७ असा क्रम लागतो.

    Corona increased in some parts of maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या.

    Related posts

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

    Nilesh Ghaiwal, : लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला; यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती

    Mumbai BMC : मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर; 11 नोव्हेंबरला सोडत, तर 28 तारखेला अंतिम आरक्षण