• Download App
    म्युकरमायकोसीस मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा ; मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला खडसावले ; Amphotericin हे औषध योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश। Control deaths due to mucor mycosis infarction; Mumbai High Court slams Mahavikas Aghadi government

    म्युकरमायकोसीस मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा ; मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला खडसावले ; Amphotericin हे औषध योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश

    म्युकर वरचं औषध योग्य प्रमाणात वाटप करण्याचाही सूचना 


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : म्युकरमायकोसीस मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला केली आहे. म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या आजारामुळे होणारे मृत्यू महाराष्ट्रात वाढत आहेत असं सरकारने न्यायालयत सांगितलं. ज्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ही सूचना केली आहे. एवढंच नाही तर या आजारात लागणारं औषध Amphotericin हे पण योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. Control deaths due to mucor mycosis infarction; Mumbai High Court slams Mahavikas Aghadi government

    Mucormycosis अर्थात काळी बुरशी हा आजार नियंत्रणात आणण्याच्या औषधाचं उदाहरण देताना कोर्टाने दमण, दीव, दादरा नगर हवेली, लक्षद्विप, अंदमान यांची उदाहरणं दिली. अंदमान, दादरा आणि नगर हवेली तसंच लक्षद्विप या ठिकाणी म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची संख्या शून्य आहे. मात्र या ठिकाणी Amphotericin या औषधाचे 500 डोस देण्यात आले आहेत. ते का? असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे.


    म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा; खासगी रुग्णालयांतील उपचारांचे दर निश्चित


    म्युकरवरचं औषध वाटप करत असताना त्यामध्ये धोरण दिसत नाही. मणिपूरमध्ये म्युकरमायकोसिसचा एक रूग्ण आहे तरीही इथे 50 डोस देण्यात आले आहेत. त्रिपुरा या ठिकाणी एक रूग्ण आहे मात्र एकही डोस देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात 82 रूग्णांचा मागील 36 तासांमध्ये म्युकरमायकोसिसमध्ये मृत्यू झाला आहे. देशातल्या 23 हजार 254 म्युकरमायकोसिसच्या रूग्णांपैकी 25 टक्के रूग्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र महाराष्ट्रात औषध पुरवठा 20 टक्केच करण्यात आला आहे. या औषधाचा साठा केंद्राने वाढवायला हवा नाहीतर आणखी मृत्यू होऊ शकतात.असेही मुंबई उच्च न्यायालयाने नमुद केले आहे.

    Control deaths due to mucor mycosis infarction; Mumbai High Court slams Mahavikas Aghadi government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!