• Download App
    मुंबई ते हैदराबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वेने जोडा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र |Connect Mumbai to Hyderabad, Pune to Aurangabad by high speed train; Chief Minister Uddhav Thackeray's letter to Prime Minister Modi

    मुंबई ते हैदराबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वेने जोडा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल. मात्र, याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैदराबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.Connect Mumbai to Hyderabad, Pune to Aurangabad by high speed train; Chief Minister Uddhav Thackeray’s letter to Prime Minister Modi

    मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की, प्रस्तावित मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग सुरु करण्याचे टाकण्याचे ठरविले आहे.



    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैदराबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैदराबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल.
    याशिवाय पुणे आणि औरंगाबाद ही शहरे देखील हाय स्पीड रेल्वे मार्गाने जोडावीत म्हणजे केवळ या दोन शहरांनाच नव्हे तर नाशिक लाही त्याचा मोठा फायदा होईल.

    कारण सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई –नाशिक- औरंगाबाद हे एकमेकांना जोडले जाणार आहेतच. मुंबई ते हैदराबाद या मार्गामुळे मुंबई आणि पुणे देखील हाय स्पीडने जोडले जाणार आहेत. याशिवाय राज्य शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित केला आहे. त्यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकाना जोडली जाऊन उद्योग –व्यवसायांना विशेषत: ऑटोमोबाईल उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल.

    Connect Mumbai to Hyderabad, Pune to Aurangabad by high speed train; Chief Minister Uddhav Thackeray’s letter to Prime Minister Modi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना