प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र असले तरी वाद अद्याप मिटलेला नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी, एबी फॉर्मचा घोळ आणि थोरातांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची नियुक्ती केली आहे. त्यांना तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.Congress leaders send Kerala envoy on Thorat Vs Patole dispute: Chennithala appointed for settlement
थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात थेट दिल्लीला पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून त्यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याची तक्रार केली होती. तसेच विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमधील खदखद समोर आली होती.
हा वाद लक्षात घेता पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांना तातडीने मुंबईत पाठवण्यात आले. मुंबई भेटीत वादावर तोडगा न निघाल्याने थोरात यांना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्याचा सल्ला देण्यात आला.
दुसरीकडे बुधवारी मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी शेजारी-शेजारी बसून दिलजमाई झाल्याचा दावा केला होता. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी रमेश चेन्निथला यांची नियुक्ती केली असून तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, असे के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटले.
Congress leaders send Kerala envoy on Thorat Vs Patole dispute: Chennithala appointed for settlement
महत्वाच्या बातम्या
- अमित शाहांचा पुणे दौरा माध्यमांनी जोडला फक्त पोटनिवडणुकीशी, पण ती तर महाराष्ट्र दिग्विजयाची नांदी!
- शाहीन बागेतली प्रेम कहाणी : स्वरा भास्करचे समाजवादी नेता फहाद जिरार अहमदशी गुपचूप कोर्ट मॅरेज!!
- चिंचवड पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे बंडखोर राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा; राष्ट्रवादीला डोकेदुखी
- एअर इंडियाची विक्रमी झेप; अमेरिका आणि फ्रान्सकडून खरेदी करणार एकूण ८४० विमाने!!