विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमिताभ बच्चन यांना २०१७ साली रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत नोटिस बजावली होती. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मग मुंबई महानगरपालिकेने कुठलीच कारवाई का केली नाही, असा सवास काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी उपस्थित केला आहे Congress eye on Amitabh Bachchan’s wall, question over not taking action on bungalow despite issuing notice for road widening
रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या अंतर्गत अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा या बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी देण्याची नोटीस त्यांना २०१७ साली पाठवण्यात आली होती. २०१९ मध्ये मुंबई महापालिकेने बंगल्याची हद्द सूचित करणारी भिंत हटवण्यात आली होती. मात्र त्यांच्या बंगल्याला काहीही करण्यात आले नव्हते.
काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आणलं आहे. बाकी सर्व जागा पालिकेने ताब्यात घेतली आहे. तर मग बच्चन यांच्या मालकीचीच जागा अजून ताब्यात का घेतली नाही? नोटीस पाठवूनही त्याच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याबरोबर जर कारवाई झाली नाही, तर आम्ही याविरोधात तक्रार करु असा इशाराही मिरांडा यांनी दिला आहे.
नागरी सर्वेक्षण अधिकाºयांकडे प्रकरण पाठवून महापालिका फक्त वेळ घालवत आहे असा आरोपही मिरांडा यांनी केला आहे. मिरांडा यांना उत्तर देताना के-वेस्ट वॉर्डच्या अधिकाºयांनी सांगितलं की, एकदा का नागरी सर्वेक्षण विभागाने प्रतिक्षा बंगल्याचा कोणता आणि किती भाग ताब्यात घ्यायचा आहे हे निश्चित केलं की महापालिका त्वरित कारवाई करुन हा भाग ताब्यात घेईल.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी प्रतिक्षा बंगल्याचा अपेक्षित भाग ताब्यात घेण्यासाठीचा विनंती अर्ज डिसेंबर २०१९ मध्ये केला आहे आणि आवश्यक ते शुल्कही भरलं आहे. यासाठीची मोजणी फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेली आहे.
या भागाच्या भौगोलिक रचनेमुळे काही अडचणी येत आहेत मात्र या प्रकरणातली सर्व माहिती नागरी सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाकडे सुपुर्त करण्यात आली असल्याचं संबंधित अधिकाºयांकडून कळत आहे.
Congress eye on Amitabh Bachchan’s wall, question over not taking action on bungalow despite issuing notice for road widening
महत्त्वाच्या बातम्या
- Power Crisis In Punjab : पंजाबात वीज संकट गडद, आंदोलन करणारे आप खा. भगवंत मान आणि आ. हरपाल चिमा पोलिसांच्या ताब्यात
- OBC Reservation : ओबीसींच्या आरक्षणासाठी महादेव जानकर आक्रमक; रविवारी राज्यभरात करणार चक्काजाम
- लसीकरणावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, NPCI ला ई-व्हाउचर निर्मितीचे दिले निर्देश
- खुशखबर : पोलीस शिपाईसुद्धा होऊ शकणार PSI, गृहविभागाचे प्रस्तावावर काम सुरू, पावसाळी अधिवेशनानंतर निर्णय
- राफेल मुद्द्यावरून संबित पात्रांचे राहुल गांधींवर शरसंधान, म्हणाले- किमतीवर सतत वेगवेगळी वक्तव्ये केली!