विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय पातळीवरचा प्रमुख पक्ष काँग्रेसला गेल्या काही वर्षापासून अध्यक्ष नाही. या बद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसला अध्यक्ष नसल्याने अथांग सागरात एखादे जहाज कप्तानाशिवाय हेलकावे खात आहे, भरकटत चालले आहे.Congress does not have a president; Concern for Sanjay Raut
पक्षाने अनेक निवडणुका या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या. त्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांचा समावेश होता. त्यात काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला खंबीर असे नेतृत्व मिळालेले दिसत नाही. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष नेतृत्वावरून टीका केली. पण, काँग्रेस गांधी घराण्याला कवटाळून बसून वाटचाल करत आहे.
राहुल गांधी यांचे नेतृत्व हे जनतेने साफ नाकारले आहे, हे विविध निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाला. कोणताही पक्ष असेल त्याला नेतृत्व पक्षाध्यक्ष हवाच. तेव्हा तो पक्ष काम करू शकतो.
काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षाचे मोलाचं कार्य केले आहे, असे असताना गेल्या काही वर्षापासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणं ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत आहे पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात, असे ते म्हणाले.
- राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यावर नेतृत्वहीन
- काँग्रेसला अध्यक्ष हा कोणत्याही परिस्थितीत हवा
- कोणताही पक्ष असेल त्याला पक्षाध्यक्ष हवाच
- काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष
- पक्षाला अध्यक्ष नसणं ही चांगली गोष्ट नाही
- अध्यक्ष मिळाल्यास कार्यकर्त्याना दिशा मिळेल