प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्वीट करत शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.Congratulations Eknathji, but don’t stay unconscious Best wishes from Raj Thackeray
राज ठाकरे यांनी शिंदेचं अभिनंदन करताना ट्वीटमध्ये म्हटले आहे की, श्री. एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन! असे म्हटले आहे.
उद्धव यांच्या राजीनाम्यानंतरही केले होते ट्वीट…
एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्व:चे कर्तृत्व समजू लागतो. त्या दिवसापासूनच त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
भोंगे वादाप्रकरणी मनसे सैनिकांची ठिकठिकाणी धरपकड करण्यात आली होती. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबले. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही, उद्धवजी तुम्हीही नाही!, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता.
Congratulations Eknathji, but don’t stay unconscious Best wishes from Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रासाठी भाजपचा दूरवरचा विचार, म्हणून हा मास्टरस्ट्रोकच, वाचा खरी रणनीती
- शिंदे – फडणवीस सरकार : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो आरे कारशेड ते जलयुक्त शिवार सर्व जुना योजनांचे पुनरुज्जीवन!!
- मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस एकटेच नाहीत; मग एवढी चर्चा का??; उपमुख्यमंत्री की कार्यकारी मुख्यमंत्री??
- प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षादेशाचे पालन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट!!