बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याने हे पाऊल उचलले आहे.Concrete measures need to be taken to prevent child marriage; State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar sent a letter to the Chief Minister
विशेष प्रतिनिधी
पुणे : अलीकडच्या काळात राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे. बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याने हे पाऊल उचलले आहे.
यावेळी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचं निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजेच सरपंच असो , तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करावी. त्यानंतर अश्या प्रकारची घटना घडली व त्यांचे दोष सिद्ध झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावं.
दरम्यान ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये करावी. बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करण्यात यावे अशी शिफारस राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून करत असल्याचे पत्र रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
Concrete measures need to be taken to prevent child marriage; State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar sent a letter to the Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
- MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार
- लाईफ स्किल्स : मोठा विचार करा, त्यावर कार्य करा
- गृहमंत्र्यांनी माझा मला धमक्या देण्यापेक्षा रझा अकादमीवर बंदी घालावी; आमदार नितेश राणे यांचे वळसे पाटलांना आव्हान
- TERRORIST ATTACK:मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह ५ जवान शहीद; पत्नी आणि मुलाचाही मृत्यू