• Download App
    रेशनकार्ड हवे तर मग जातीच्या प्रमाणपत्राची सक्ती; नव्या नियमामुळे सामान्य जनतेच्या डोक्याला ताप । Compulsory submission of caste certificate for issuance of ration card

    रेशनकार्ड हवे तर मग जातीच्या प्रमाणपत्राची सक्ती; नव्या नियमामुळे सामान्य जनतेच्या डोक्याला ताप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी तसेच रेशन कार्डात बदल करण्यासाठी जातीच्या प्रमाणपत्राची सक्तीचा नवा नियम सामान्य जनतेच्या डोक्याला तापदायक ठरू लागला आहे. Compulsory submission of caste certificate for issuance of ration card

    अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लोकांना हा नियम जाचक ठरत आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना योग्य आणि पुरेशा प्रमाणात रेशनचे धान्य मिळावे, हा सरकारचा उदात्त हेतू आहे. पण त्यासाठी सरकारने जो उपाय केला आहे. त्यामुळे दलित समाजातील लोकांच्या डोक्याला नवा ताप झाला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यानुसार नवीन रेशन कार्ड बनवताना किंवा सध्याच्या रेशन कार्डात दुरूस्ती करताना जात प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली. तशा सूचना पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.



    2 जून २०२१ च्या आदेशानुसार, रेशन धान्य वाटपासाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये जातीच्या उल्लेखासाठी स्वतंत्र रकाना आहे. तो भरल्याशिवाय अर्जच स्वीकारला जात नाही. त्यामुळे आता गोरगरीब, दलित बांधवांना जात प्रमाणपत्रासाठी सरकार दरबारी हेलपाटे घालावे लागणार आहेत. ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी रेशनचं धान्य घ्यावं लागतं, त्यांना जात प्रमाणपत्रासाठी आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची वेळ आली आहे.

    Compulsory submission of caste certificate for issuance of ration card

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा