• Download App
    नारायण राणेंबद्दल महिला आयोगाकडे तक्रार मुंबईच्या महापौरांच्या अर्जावर कार्यवाही सुरू Complaint to Women's Commission about Narayan Rane Proceedings on the application of the Mayor of Mumbai started

    नारायण राणेंबद्दल महिला आयोगाकडे तक्रार मुंबईच्या महापौरांच्या अर्जावर कार्यवाही सुरू

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. दिशा सालियान सुशांतसिंग राजपूत यांची व्यवस्थापक होती. पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून कार्यवाही सुरू झाली आहे. Complaint to Women’s Commission about Narayan Rane Proceedings on the application of the Mayor of Mumbai started

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाकडे पेडणेकर यांनी तक्रार केली. दिशा हिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.



    मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नाही. त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याला तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही राणे यांनी सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी विनंती महिला आयोगाकडे केली आहे.

    दरम्यान, आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना 48 तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत.

    Complaint to Women’s Commission about Narayan Rane Proceedings on the application of the Mayor of Mumbai started

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस