प्रतिनिधी
मुंबई : कोरोना रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले तर सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना केले आहे.CM uddhav thackeray telephones devendra fadanavis and raj thackeray
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना फोन केले. त्यानंतर कोरोना परिस्थितीची जाणीव करून देत सरकारला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर राज यांनी मनसैनिकांना आवाहन केले आहे.
राज्यात करोनानं थैमान घातल्यानंतर सरकारनं लॉकडाउन सदृश्य निर्बंध लागू करण्याचा विचार सुरू केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसे संकेत दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विविध उद्योजकांसह विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली.
रविवारीही मुख्यमंत्र्यांनी अनेक मान्यवरांशी संवाद साधला. त्याचबरोबर करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णया आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो.
त्यामुळे अशा परिस्थितीत मनसेनं सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
“महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरून केलेल्या संवादात केलं.
आपण सर्वांनी सरकारी सूचनाचे पालन करावे. सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे,” असे ट्विट मनसेने केले आहे.