महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील ३ ते ४ दिवस ते रिलायन्स ग्रुपच्या हरकिशनदास रुग्णालयात उपचार घेणार आहेत. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मानेजवळ दुखत होते. त्यानंतर सोमवारी त्यांची चाचणी झाली. चाचणीत त्यांना मानेजवळील मणक्यामध्ये आणि पाठीत दुखत असल्याचे निदान झाले. आज त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरे होतील. cm uddhav Thackeray admitted in hm reliance hospital suffering from cervical and back pain
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील ३ ते ४ दिवस ते रिलायन्स ग्रुपच्या हरकिशनदास रुग्णालयात उपचार घेणार आहेत. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मानेजवळ दुखत होते. त्यानंतर सोमवारी त्यांची चाचणी झाली. चाचणीत त्यांना मानेजवळील मणक्यामध्ये आणि पाठीत दुखत असल्याचे निदान झाले. आज त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरे होतील.
डॉ. शेखर भोजराज त्यांची शस्त्रक्रिया करणार आहेत. आज ज्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे त्याच एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रकृतीचीही तपासणी करण्यात आली. गेल्या सोमवारी झालेल्या तपासणी आणि चाचणीचा अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे दुखणे गेल्या आठवड्यापासून सुरू झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानेच्या आणि मणक्याच्या त्रासामुळे अनेक कार्यक्रम रद्द केले होते. ते लोकांशी भेटणेही कमी करत होते. दिवाळीच्या दिवशी त्यांच्या वर्षा बंगल्यावर जाणाऱ्यांनाही ते क्वचितच भेटायचे. वेदना वाढत होत्या. त्यामुळे आता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
cm uddhav Thackeray admitted in hm reliance hospital suffering from cervical and back pain
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल