प्रतिनिधी
नागपूर : विधिमंडळ अधिवेशन हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज जोरदार टोलेबाजी केली. महाविकास आघाडीचा विधानसभा अध्यक्षांविरुद्धचा बारगळलेला अविश्वास प्रस्ताव त्यावर अजितदादांची सहीच नसल्याचा मुद्दा यामुळे महाविकास आघाडी आधीच विस्कळीत झाली होती. CM Eknath Shinde bowled out opposition in maharashtra legislative assembly over all issues on concluding day of the winter session
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सत्ताधारी आघाडीच्या सत्ताधारी युतीच्या काही मंत्र्यांना धारेवर धरण्याचा जरूर प्रयत्न केला. यात गिरीश महाजन यांचा समावेश होता. पण सायंकाळ झाल्यावर अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी युतीवर विरोधकांच्या दिशेने आलेले वाग्बाण संपूर्णपणे विरोधकांवर उलटवले. अजितदादा आणि सर्व विरोधी आमदारांनी केलेले सर्व आरोप नुसतेच फेटाळले असे नाही तर मागच्या ठाकरे – पवार सरकारचे या निमित्ताने वाघाडे काढून घेतले.
- जो बायडेन आणि पुतीन यांच्यात चर्चा, उद्धव ठाकरे आहेत कोण?; राऊतांचे टोले शिंदेंना, निघाली ठाकरेंची!!
मूळात महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारावा कोणी?? ज्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पत्रकार अर्णव गोस्वामी आणि राहुल कुलकर्णी यांना आत घातले, त्यांनी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न विचारावेत?? त्यांना अधिकार तरी आहे का??, असा रोकडा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. दादा, तुम्ही म्हणालात आम्हाला सत्तेची मस्ती आहे. पण निर्दोष लोकांना तुरुंगात घालणाऱ्यांना सत्तेची मस्ती होती??, की आम्हाला आहे??, आम्ही कुणाला तुरुंगात घातले??, असा खोचक सवालयुक्त टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे – पवारांना लगावला. महाराष्ट्रात गेल्या वर्षापेक्षा यावर्षी गुन्हे वाढल्याचे आकडेवारी अजित दादांनी सादर केली. पण याचा अर्थ आम्ही कन्व्हिक्शन रेट वाढवला आहे. गुन्ह्यांची नोंद वाढवली आहे. पूर्वी गुन्हेच नोंदवले जात नव्हते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे – पवार सरकारला लगावला.
मी भूखंडाचे श्रीखंड विधिमंडळाबाहेर वाचले. एनआयटीचा घोटाळा माझ्याविरुद्ध काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा पर्दाफाश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दादा तुम्ही एवढा मोठा पहाड खोदला. मी म्हणणार होतो, पहाड खोदून तुम्ही चुहा काढला. पण देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहाड खोदून चुहा पण निघाला नाही.
आमच्या मंत्र्यांवर तुम्ही आरोप केलेत. त्यांचे राजीनामे मागितले पण तुमच्याच काळातले दोन मंत्री जेलमध्ये गेले तरी तुम्ही राजीनामे घेतले नव्हते, याची आठवण एकनाथ शिंदे यांनी ठाकरे – पवारांना करून दिली आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी अजूनही काही लोक जेलमध्ये जाऊ शकतात असे सूचक विधान केले.
गेल्या सहा महिन्यांत सरकारने केलेल्या कामांची पावती ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने शिवसेना – भाजप युतीला दिली आहे. कारण भाजपचे 3095 सरपंच निवडून आले आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे 1500 पेक्षा जास्त सरपंच निवडून आले. ही आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केली. त्यावर नाना पटोले यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना नाना तुम्ही कितीही आकडे आणा. पण खरे आकडे आम्हाला माहिती आहेत. आम्ही आमचे सरपंच थेट मीडिया समोर उभे करून दाखवले आहेत, असा टोला हाणला.
नागपुरात दोन वर्षांनी झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे सगळे बाउन्सर्स फटकावून काढले.
CM Eknath Shinde bowled out opposition in maharashtra legislative assembly over all issues on concluding day of the winter session
महत्वाच्या बातम्या