• Download App
    पुण्यात मेट्रोच्या खांबावर लावले नगरसेवकाच्या वाढदिवसाचे फ्लेक्स , नागरिकांनी व्यक्त केला संतापCitizens express outrage over corporator's birthday flakes on metro poles in Pune

    पुण्यात मेट्रोच्या खांबावर लावले नगरसेवकाच्या वाढदिवसाचे फ्लेक्स , नागरिकांनी व्यक्त केला संताप

    पाहिलं गेलं तर पालिका अधिनियमानुसार मेट्रोच्या खांबावर फ्लेक्स किंवा बँनर लावण्याची कोणालाही परवानगी नाही, अस मेट्रो पदाधिकारी सांगत आहेत.Citizens express outrage over corporator’s birthday flakes on metro poles in Pune


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स कोथरूड मध्ये मेट्रोच्या चार खांबावर लागले आहेत. यामुळे नागरिकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. पाहिलं गेलं तर पालिका अधिनियमानुसार मेट्रोच्या खांबावर फ्लेक्स किंवा बँनर लावण्याची कोणालाही परवानगी नाही, अस मेट्रो पदाधिकारी सांगत आहेत.

    जर बँनर लावायचे असल्यास त्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते.तसेच याप्रकरणी चलन आकारणी करुन परवानगी दिली जात असते.परंतु कोथरूड मधील मेट्रो खांबा अनाधिकृत फ्लेक्स लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या परवानगीने लावले आहेत. असा प्रश्न नागरिकांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.



    तसेच हे बँनर मेट्रो खांबाला नुसते लटकवले आहेत.दरम्यान अचानक वारा आला तर ते बॅनर खाली पडून नागरिक जखमी होऊ शकतात.मग याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    यावेळी स्थानिक नागरिक दिप्ती कुलकर्णी म्हणाल्या की , ”केंद्राने राबविलेल्या योजनांचे कोथरूड मध्ये बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. मनमानी कारभारामुळे परिसर गलिच्छ वाटत आहे. या गोष्टी लोकप्रतिनिधीना शोभत नाहीत.”

    दरम्यान ”या फ्लेक्सची कोणतीही परवानगी दिली गेली नाही. पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. धोकादायक फ्लेक्स तातडीने हटविण्यात येतील व अनाधिकृत बँनर वर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आकाशचिन्ह निरीक्षक संतोष गोंधळेकर यांनी सांगितले.”

    Citizens express outrage over corporator’s birthday flakes on metro poles in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस