प्रतिनिधी
मुंबई : सिंधुदुर्गाचा पर्यटनातून विकास व्हावा यासाठी सिंधुदुर्गात विमानतळ व्हावे हे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे स्वप्न होते. राणे साहेबांच्या अथक प्रयत्नांनी २००९ साली विमानतळ मंजूर होऊन राणेंनी २०१४ पर्यंत पालकमंत्री असताना या कार्यकाळापर्यंत विमानतळाचे ७० टक्के काम पूर्ण झाले होते.Chipi airport credit goes to Narayan Rane only, claimed MLA Nitesh rane
मध्यंतरीच्या काळात धीम्या गतीने सुरू असलेले काम राणेंच्या भाजप प्रवेशानंतर अधिक गतीने सुरू झाले. विमानतळ हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने केंद्राच्या सर्व परवानग्या नारायण राणे यांनी मिळवून दिल्या.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे विमानतळ ९ ऑक्टोबर पासून जनेतसाठी कार्यान्वित होत आहे, असे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी फेसबुक पोस्ट लिहून स्पष्ट केले आहे.
या पोस्टमध्ये नितेश राणे म्हणतात :
चिपी विमानतळ होऊ नये यासाठी त्यावेळी शिवसेनेने सुरुवातीला प्रचंड विरोध केला. लोकांची दिशाभूल करून अडथळे निर्माण केले. मात्र आज विमानतळ पूर्ण होताच त्यावेळी विमानतळाला विरोध करणारे शिवसेनेचे लोक आज श्रेय लाटायला पुढे पुढे करत आहेत.
२०१४ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याशी काडीचा संबंध नसलेले विनायक राऊत फुकटच्या श्रेयासाठी बडबड करताना दिसतात.९ ऑक्टोबर २०२१ ला चिपीच्या विमानतळावरुन टेकऑफ घेणार आहे. याचे श्रेय पूर्णतः नारायण राणेंचेच आहे हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
Chipi airport credit goes to Narayan Rane only, claimed MLA Nitesh rane
महत्त्वाच्या बातम्या
- फारुख अब्दुल्लांनंतर आता मेहबूबा मुफ्तींनी आळवला तालिबानी राग, म्हणाल्या – शरियतनुसार चालावे नवे सरकार
- रामाच्या अयोध्येत भव्य दीपोत्सवाची जय्यत तयारी; आणखी एक विक्रम ; पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची शक्यता
- अनिल देशमुखांच्या वकिलाचा आणि सीबीआय इन्स्पेक्टर अभिषेक तिवारीचा जामीन अर्ज दिल्ली कोर्टाने फेटाळला
- WATCH : संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव बेळगाववरून देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका