• Download App
    मुख्यमंत्र्यांची संघावर टीका; नाराज श्याम देशपांडे यांचा शिवसेनेला रामराम!!Chief Minister's criticism of the team; Disgruntled Shyam Deshpande's goodbye to Shiv Sena !!

    पुण्यात धक्का : मुख्यमंत्र्यांची संघावर टीका; नाराज श्याम देशपांडे यांचा शिवसेनेला रामराम!!

    प्रतिनिधी

    पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधल्या शिवसेनेच्या संपर्क मेळाव्यात भाजप बरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शरसंधान साधले. त्यामुळे नाराज होऊन शिवसेनेचे पुण्यातले नेते माजी शहरप्रमुख श्याम देशपांडे यांनी शिवसेनेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. Chief Minister’s criticism of the team; Disgruntled Shyam Deshpande’s goodbye to Shiv Sena !!



    श्याम देशपांडे यांनी एक पत्रक काढून स्वतःची नाराजी उघड केली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका करण्यामध्ये काही गैर नाही. परंतु त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनावश्यक राजकारणात ओढले आहे. वास्तविक संघाच्या हिंदुत्वाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तम पद्धतीने आक्रमक स्वरूप दिले होते. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघावर टीका करून बेगडी धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पदर धरला आहे, असे टीकास्त्र श्याम देशपांडे यांनी सोडले. मुख्यमंत्र्यांच्या टीकेमुळे व्यथित होऊन आपण शिवसेना पक्षाचे काम थांबवले असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

    – श्याम देशपांडेंवर उलटे संधान

    श्याम देशपांडे यांना शहर प्रमुख तसेच पुणे महापालिकेवर तीन वेळा नगरसेवक पदाची संधी देऊनही ते समाधानी नव्हते. त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला आहे, असे टीकास्त्र शिवसेनेचे विद्यमान शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी सोडले आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेऊन आगामी 25 वर्षे महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहायला पाहिजे असे असे काम करा. अशी जबरदस्त संघटना बांधा असे आवाहन करीत होते. त्याच वेळ पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात शिवसेनेचा एकेकाळचा खंदा नेता पक्षाचे काम थांबवताना दिसला आहे.

    Chief Minister’s criticism of the team; Disgruntled Shyam Deshpande’s goodbye to Shiv Sena !!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस