वृत्तसंस्था
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरे यांनी हा डोस घेतला. Chief Minister Uddhav Thackeray second dose of vaccine taken at the j j hospital.
याविषयीची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली. दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे हे लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रुग्णालयामध्ये आले.
मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले आहेत. पहिला डोस ११ मार्च रोजी घेतला होता, त्यानंतर २८ दिवसांनी त्यांनी आज दुसरा डोस घेतला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच पुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आदित्य हे होम क्वारंटाइन असून रश्मी ठाकरेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. रश्मी ठाकरे यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. २३ मार्चला रश्मी ठाकरे यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता.
लस घेण्याचे जनतेला आवाहन
पहिली लस घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांनी जनतेला लस घेण्यास सांगितले होते. लसीबद्दल भिती आणि संभ्रम ठेऊ नका. शंका न ठेवता लस टोचून घ्या,’ असं आवाहन त्यांनी केले होते.