• Download App
    मुख्यमंत्र्यांची दुसऱ्या दिवशीही दांडी; गैरहजेरीवरून विधानभवनात गोंधळ । Chief Minister is Absent on second day ; Confusion in the Vidhan Bhavan

    मुख्यमंत्र्यांची दुसऱ्या दिवशीही दांडी; गैरहजेरीवरून विधानभवनात गोंधळ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. पहिल्या दिवशी ते आले नव्हते. त्यामुळे या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी हल्लाबोल केला. Chief Minister is Absent on second day ; Confusion in the Vidhan Bhavan

    हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे अनुपस्थित राहिले. त्यामुळे या मुद्यावरून जोरदार टीका केली. खरे तर नागपूर येथे अधिवेशन घेण्याची तयारी होती. पण, मुख्यमंत्री यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार केवळ पाच दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णयही सरकारने घेतला. कोरोना नियंत्रणात आला असताना अधिवेशनाचा कालावधी सरकारने कमी केला आहे.



    कारण सरकार विरोधकांना सामोरे जाऊ शकत नसल्याने हा कालावधी कमी केल्याचा आरोप केला. दुसरीकडे मुंबईत अधिवेशन घेऊनही मुख्यमंत्री अधिवेशनासाठी आले नाहीत. मात्र अधिवेशनाच्या अगोदर त्यांनी विधिमंडळाला भेट देऊन पाहणी मात्र केली होती. त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी रस्ता ही गुळगुळीत करण्यात आला. मात्र, एवढे करूनही ते अधिवेशनाला उपस्थित राहिले नसल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पदाचा चार्ज अन्य कोणाकडे का दिला नाही? असा सवालही केला होता.

    Chief Minister is Absent on second day ; Confusion in the Vidhan Bhavan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते