‘’काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो’’ असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून विशेषता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने जोरदार टीका, टिप्पणी सुरू आहे. ज्यावर आतापर्यंत मुख्यमंत्र्यांकडून फारशी प्रतिक्रिया दिली गेली नव्हती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Chief Minister Eknath Shinde responded to Uddhav Thackerays criticism
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, ‘’काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.’’
याचबरोबर ‘’जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे….’’ असंही एकनाथ शिंदेंनी म्हणत टोला लगावला आहे.
याशिवाय ‘’केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की.’’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? –
‘’जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही शक्य होतं, ते मी केलं. ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला घेणारचं’’ अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केली होती.
Chief Minister Eknath Shinde responded to Uddhav Thackerays criticism
- मोदी सरकारचा मोठा निर्णय! देशभरात १५० पेक्षा अधिक नर्सिंग कॉलेज सुरू होणार
- उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे कपडे फाडू; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा
- NCERT ने हटवलेला अभ्यासक्रम केरळात शिकवणार, गुजरात दंगलीचे प्रकरण पुन्हा समाविष्ट करणार
- आयुर्वेदिक डॉक्टरांना एमबीबीएस प्रमाणे समान वेतनाचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाने रद्द केला गुजरात हायकोर्टाचा निर्णय