प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी स्वरूप आले असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केले. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे म्हटले. त्यावर आता माजी खासदार संभाजी राजे यांनी अजित पवार यांना चुकीचे ठरवले. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होतेच, तसेच ते धर्मवीरही होते. तसे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत, असे संभाजी राजे पत्रकार परिषदेत अजितदादांना सुनावले आहे. Chhatrapati Sambhaji Maharaj is a swaraj raksha Dharmaveer
काय म्हणाले संभाजी राजे?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीसाहेब यांनी या हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले. त्याबद्दल दुमत नाही. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचेही रक्षण केले, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच, त्यापाठोपाठ ते धर्मरक्षकही आहेत. हे म्हटले तर काही चुकीचे होणार नाही. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, असे संभाजी छत्रपती यांनी सांगितले.
अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन ते विधान केले, ते त्यांनीच सांगावे. कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना त्यावर अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका, अशी माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहील, असेही संभाजी राजे म्हणाले. सभागृहात बोललेल्या विधानाला अधिकृतपणा येतो. सभागृहाच्या बाहेर काहीही बोलले जाते, सभागृहात मात्र अभ्यास करूनच बोलावे लागते. मग कोणताही विषय असो, असेही संभाजी राजे म्हणाले.
Chhatrapati Sambhaji Maharaj is a swaraj raksha Dharmaveer
महत्वाच्या बातम्या
- नोटबंदीचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या वैधच; सुप्रीम कोर्टाचा 4 – 1 बहुमताने निर्वाळा!!; वाचा तपशीलवार!!
- राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये 284 जागांसाठी भरती; करा अर्ज
- लोकसभा निवडणूक 2024 : एकीकडे भाजपचे महाराष्ट्रात मिशन 16; दुसरीकडे काँग्रेसच्या हक्काची जागा खेचण्याची राष्ट्रवादीची तयारी