आज नवाब मलिक यांनी ३० मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. या प्रेसमध्ये त्यांनी आज पुन्हा नवे आरोप केले आहेत.Check Wankhede’s bearded friend, CDR and CCTV footage of the three, claims Nawab Malik at press conference
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. सकाळी ९ वाजता वानखेडे यांच्या लग्नाचा फोटो ट्विट करुन पुढच्या तासाभरात त्यांनी ३० मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. या प्रेसमध्ये त्यांनी आज पुन्हा नवे आरोप केले आहेत.
त्या तीन जणांचे CDR तपासा
समीर वानखेडे, वानखेडेंचे चालक आणि प्रभाकर साईल यांचा CDR तपासावा.मग त्यांच्या सीडीआरमधून सगळा घटनाक्रम समोर येईल, अस नवाब मलिक म्हणाले. प्रभाकरने व्हिडीओद्वारे सगळा घटनाक्रम समोर आणलाय. या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे. विशेष म्हणजे क्रूझ पार्टीची महाराष्ट्र पोलिसांकडून परवानगी घेतलेली नव्हती, असंही नवाब मलिक म्हणाले.
वानखेडेंचा तो दाढीवाला मित्र
नवाब मलिक यांनी धक्कादायक आरोप केला आहे.मलिक म्हणाले की, क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाचा सहभाग होता. हा तोच दाढीवाला आहे, जो समीर वानखेडेंचा मित्र आहे. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज मागवावं. त्याची प्रेमिका बंदूकीसह क्रूझवर होती. एका व्हिडीओत ती डान्स करताना दिसून येत आहे. क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल असं देखील नवाब मलिक म्हणाले.
समीर आणि डॉ. शबाना कुरेशी निकाहाचा फोटो मलिकांकडून ट्विट
तसंच एका तासापूर्वी मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो प्रदर्शित केला आहे, जो डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत निकाह केल्याचा आहे. म्हणजेच मलिक वारंवार हेच स्पष्ट करु इच्छित आहे की समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊदच आहे आणि ते मुस्लिमच आहेत.
Check Wankhede’s bearded friend, CDR and CCTV footage of the three, claims Nawab Malik at press conference
महत्त्वाच्या बातम्या
- … अन्यथा कृषी कायदे आणि बीएसएफच्या अधिकाराची हद्द पंजाब विधानसभा रद्द करेल; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा केंद्राला इशारा
- फेसबुक सीईओ झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चानवर माजी कर्मचार्यांनी केला खटला दाखल, घरात गैरवर्तनाचा आरोप
- PM मोदींची सत्तेतील 20 वर्षे, अमित शाह म्हणाले- “पंतप्रधान मोदींना आज माझ्यापेक्षा जास्त जनता ओळखते!”
- Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या काझींचा खुलासा, म्हणाले- ‘लग्नाच्या वेळी मुसलमान होते संपूर्ण कुटुंब’