प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या आज संभाजी छत्रपती संभाजी नगरात होणाऱ्या पहिल्या वज्रमूठ सभेसाठी जोरदार तयारी स्थानिक नेत्यांनी केली असली तरी महाविकास आघाडीचे राजकीय वजन वाढण्यासाठी ठाकरे गटानेच सर्वात जास्त जोर लावला असून काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मात्र निवांत बैठका सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.Chatrapati Sambhajinagar MVA rally; Shivsena Thackeray faction is on the driver’s seat but Congress – NCP lagging behind
छत्रपती संभाजीनगरात बऱ्याच वर्षांपासून तसाही शिवसेनेचा जोर आहे. त्यातच ठाकरे विरुद्ध शिंदे असे दोन गट तयार झाल्यानंतरही सर्वात जास्त आवाज शिवसेनेचाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेची तयारी करताना शिवसेनेचेच नेते आघाडीवर दिसत आहेत. छत्रपती संभाजी नगरात या वज्रमूठ सभेची जी पोस्टर्स लागली आहेत, त्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचाच जोर दिसत असून शरद पवार, सोनिया गांधी, अजितदादा पवार नाना पटोले यांचे छोटे फोटो वापरले आहेत.
राहुल गांधींचा फोटो तर पोस्टरवरूनही गायब आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांचे नेते राहुल गांधींवर संतापले असतील, तर ते नैसर्गिक आहे. पण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील महाविकास आघाडीच्या पोस्टरवर राहुल गांधींची छबी नकोशी झाली आहे. राहुल गांधींचे नाव महाविकास आघाडीच्या टिझर मधून आधी वगळले होतेच. आता पोस्टरवरूनही गायब झाल्याने राहुल गांधींचे नेमके स्थान आहे तरी काय??, हा प्रश्न तयार झाला आहे.
ज्यावेळी छत्रपती संभाजी नगर मध्ये महाविकास आघाडीचे वजन मोठ सभा होते आहे त्याच वेळी शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना भाजप सावरकर गौरव यात्रा काढत आहेत. त्यामुळे शक्ती प्रदर्शनात आपणही कुठे कमी नाही हे दाखवण्याचा या दोन्ही पक्षांचा जोरदार प्रयत्न आहे एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, तर दुसरीकडे शिवसेना – भाजपच्या तीन सावरकर गौरव यात्रा यामुळे छत्रपती संभाजीनगर हे आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे एपी सेंटर ठरणार आहे.
Chatrapati Sambhajinagar MVA rally; Shivsena Thackeray faction is on the driver’s seat but Congress – NCP lagging behind
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा