विशेष प्रतिनिधी
पुणे : पोलीस आणि गुंडांच्या मदतीने हे राज्य सुरु आहे. पोलिसांच्या मदतीने लोकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करतात. त्यानंतर न्यायालयात जाऊन थपडा खातात असा आरोप करत परिवहन मंत्री अनिल परब आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.Chandrakant Patil warns to go to court against Anil Parab, Nilam Gorhe
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाºयांनी नारायण राणे यांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर शिवसेनेवर हल्ला चढविताना पाटील म्हणाले, आम्हाला खात्री होती सत्याचा विजय होणार, पोलीस आणि गुंडांच्या मदतीने हे राज्य सुरु आहे.
सारखं पोलिसांच्या मदतीने लोकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करतात. हे कोर्टात जाऊन थपडा खातात. जेवणासारखं थपडांचीसुद्धा त्यांना आवश्यकता झालेली आहे. ज्या खाल्ल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.पाटील म्हणाले, हे अमानवीय कृत्य झालं. जेवताना राणेंना उठवले गेले. सामान्य माणसाशीसुद्धा असा व्यवहार करायचा नसतो. त्यांचा नंतर बीपी वाढला. शुगर वाढली. त्यांना रुग्णालयात नेले नाही. हे काय चाललं आहे. जी सत्ता अकृत्रिमपणे मिळवली त्या सत्तेची एवढी नशा. यांचं हम करेसो कायदा असं सुरु आहे. हे प्रत्येक विषयावर थपडा खातात.
अनिल परब यांना आम्ही न्यायालयात खेचणार असल्याचे सांगून पाटील म्हणाले, टीव्ही 9 ने त्यांचा टॉक जो कव्हर केला, याच आधारे आम्ही कोर्टात जाणार आहोत. एका मिनिस्टरला हे अधिकार दिले आहेत का? फोर्स वाढवा. काही करुन अटक करा, कसली ऑर्डर मागताय, कशाला डिले करताय! असे ते म्हणत होते. यावरून ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आली आहे हे सिध्द आहे.
पाटील म्हणाले, आता बघा उद्यापासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरु करण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार रात्री 12 पासून 7 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. किती घाबरत आहात तुम्ही. राणेंच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय म्हणून हे घाबरले आहेत. तरीही जनआशीर्वाद यात्रा चालू होणार. काय करता बघू. त्याठिकाणी प्रवीण दरेकर, आशिष शेलार पोहोचले आहेत.
प्रसाद लाड, राणेंचं दोन्ही मुलं आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे तिथे आहेत. राणेंना जामीन देताना काही नियम घातले असतील. राणे काही न बोलता जरी सिंधुदुर्ग जिल्हात गेले तरी हजारोच्या संख्येनं लोक येतात. भाडोत्री गुंड गोळा करुन त्यांच्या घरासमोर धिंगाणा घालता काय? आमच्या पुण्याच्या कार्यालयात दोन जण चोरुन कोंबड्या सोडता काय? शिवसेनेला आज जशास तसं उत्तर दिलं आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. चळवळीतून आलेली माणसं आहोत आम्ही. कुणी धमकी द्यायचं कारण नाही. तुमच्यासारखं भाडोत्री गुंड आणून काम नाही करत.
पाटील म्हणाले, राणे साहेबांना जामीन मिळाला नसता तर राज्यभर आम्हाला प्रखर निषेध व्यक्त करावा लागला असता. तुमचा कोकणातला बेस संपला. लोकांना तुमचा चेहरा कळला.अनिल परब हे काय गृहमंत्री किंवा न्यायाधीश आहेत काय? ते पोलीस अधीक्षकांना राणेंना बळाचा वापर करा म्हणून आदेश कसा काय देऊ शकतात? शपथ घेताना तुम्ही गोपनियतेची आणि राज्याची शपथ घेता, हे राज्याचं हित आहे काय? आम्ही नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातही कोर्टात जाणार आहोत.
उपसभापती कुठल्याही पक्षाचे नसतात. पण गेल्या महिनाभरापासून त्या शिवसेनेच्या प्रवक्त्याप्रमाणे भूमिका मांडत आहेत. एवढीच हौस आहे तर उपसभापतीपदाचा राजीनामा द्या. आमच्या भाजपमधून गेलेल्या मनिषा कायंदे यांचंही काहीतरी चालू होतं. सध्या भास्करराव जाधव यांच्या तर अंगात आलं आहे. सगळ्यांना उद्धव ठाकरे यांच्या गूडबुक्समध्ये राहायचं आहे. पण यांचं काय चालू आहे काही कळायला मार्ग नाही.
Chandrakant Patil warns to go to court against Anil Parab, Nilam Gorhe
महत्त्वाच्या बातम्या
- तेव्हा तुमची आई देश विकत होती का? स्मृति ईराणी यांचा राहूल गांधींवर पलटवार
- चंदा कोचर यांच्यावर ईडीचे आरोपपत्र, व्हिडीओकॉन ग्रुपला नियम धाब्यावर बसवून ३०० कोटी कर्ज
- धक्कादायक, हवेत गोळीबार करत मगरींना खाऊ घालण्याची धमकी, उद्योजक नाना गायकवाडसह मुलावर गुन्हा दाखल
- नाना पटोले यांनी पुन्हा एकदा काढली शिवसेनेची खोडी, राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार