नाताळ हा सण आनंदाचे प्रतीक म्हणून आपण साजरा करतो.आज जगभरात नाताळाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.Chandrakant Patil offered this prayer to Lord Jesus
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस (नाताळ) हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. नाताळ हा सण आनंदाचे प्रतीक म्हणून आपण साजरा करतो.आज जगभरात नाताळाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. तर सामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वच जन नाताळाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत कोरोनाचे संकट लवकरच पूर्णपणे दूर व्हावे, अशी प्रार्थना प्रभू येशू यांच्याकडे केली आहे.
‘सर्व भारतीय ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आगामी वर्षात जगावर आलेले हे कोरोनाचे सावट लवकरच पूर्णपणे दूर व्हावे आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, हीच प्रभू येशू यांच्याकडे प्रार्थना!’ असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.