वृत्तसंस्था
मुंबई: महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाल्यानंतर आता अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.Chance of unseasonal rains in Maharashtra,Cloudy weather in many places; Decrease in temperature
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. पुढील चार दिवसांत विविध जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे.
9 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी 9 ते 12 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे.