वृत्तसंस्था
नवी दिल्ली – संरक्षण क्षेत्रातील स्त्री – पुरूष लिंगभेद मिटविणारा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDA मध्ये मुलींना प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आतापर्यंत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींना प्रवेश घेता येत नव्हता. या विरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल आहे.Centre tells Supreme Court that a decision has been taken yesterday to allow induction of girls in National Defence Academy (NDA).
केंद्रातील मोदी सरकारने कालच मुलींना एनडीएमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेऊन हा भेदभाव मिटविला आहे. या निर्णयाची माहिती सरकारने सुप्रिम कोर्टात दिली आहे. केंद्राच्या या निर्णयावर सुप्रिम कोर्टाने समाधान व्यक्त केले असून संरक्षण क्षेत्रातील स्त्री – पुरूष भेदभावावर मर्मभेदी भाष्य केले आहे.
देशाचे संरक्षण क्षेत्र अतिशय प्रतिष्ठित आणि देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारे आहे. या क्षेत्रात सेवा करण्याची संधी आणि अधिकार प्रत्येक भारतीयाला भेदभावरहित वातावरणात मिळायला हवा. संरक्षण दलांमध्ये महिलांच्या सेवांना आपले संरक्षण योग्य ते महत्त्व देईल, अशी आशाही केंद्राच्या निर्णयानंतर सुप्रिम कोर्टाने व्यक्त केली आहे.
Centre tells`-.that a decision has been taken yesterday to allow induction of girls in National Defence Academy (NDA).
महत्त्वाच्या बातम्या
- तृणमूलच्या नेत्यांना भाजपामध्ये घेतले नसते तर चांगली कामगिरी झाली असती, वरिष्ठ नेत्यांची चूक झाली, भाजपा आमदाराची खंत
- 2030 पर्यंत देशातील ऑनलाइन खरेदीदारांची संख्या असेल 500 दशलक्ष
- सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याची तयारी
- रोहिंग्यांचा कर्दनकाळ, कट्टर मुस्लिमविरोधी बौध्द भिक्षू, फेस ऑफ बौध्द टेरर विराथू यांची कारागृहातून सुटका