• Download App
    नारायण राणेंच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा निर्णय ; मिळणार Z दर्जाची सुरक्षा|Central Government's decision regarding Narayan Rane's security; Get Z level security

    नारायण राणेंच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा निर्णय ; मिळणार Z दर्जाची सुरक्षा

    राणे यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत केंद्र सरकारने ते पाऊल उचलले.राणे यांना याआधी Y दर्जाचे व्हीआयपी सुरक्षा कवच होते.Central Government’s decision regarding Narayan Rane’s security; Get Z level security


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नारायण राणे यांच्या सुरक्षेचा अलीकडेच आढावा घेण्यात आला. त्यातून जी माहिती उपलब्ध झाली त्या आधारे राणे यांना असलेला धोका लक्षात घेत केंद्रीय यंत्रणांनी राणेंची सुरक्षा वाढवण्याची शिफारस केली होती.दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना Z सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येणार आहे.

    या माहितीला सीआयएसएफचे उपमहानिरीक्षक आणि मुख्य प्रवक्ता डॉ. अनिल पांडेय यांनी दुजोरा दिला.राणे यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत केंद्र सरकारने ते पाऊल उचलले.राणे यांना याआधी Y दर्जाचे व्हीआयपी सुरक्षा कवच होते.



    नारायण राणे यांच्या सुरक्षेसाठी सहा ते सात सशस्त्र कमांडोंचे पथक तैनात असेल. ते कमांडो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) सेवेतील असतील.केंद्रीय यंत्रणांच्या शिफारसीनंतर राणे यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा दर्जा वाढवण्यात आला.

    सीआयएसएफकडून अनेक व्हीआयपी व्यक्तींना सुरक्षा पुरवली जाते. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचाही समावेश आहे.

    Central Government’s decision regarding Narayan Rane’s security; Get Z level security

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!