• Download App
    बुलडाणा : मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता, संग्रामपुरात प्रहारचे यश, तर भाजपला दोन्ही ठिकाणी भोपळा । Buldana One-sided power to Congress in Motala, success of attack in Sangrampur, while BJP lost in both places

    बुलडाणा : मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता, संग्रामपुरात प्रहारचे यश, तर भाजपला दोन्ही ठिकाणी भोपळा

    जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांकरिता आज 19 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. या दोन्ही नगर पंचायतींमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही, तर संग्रामपूरमध्ये प्रहारला एकहाती सत्ता, तर मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. Buldana One-sided power to Congress in Motala, success of attack in Sangrampur, while BJP lost in both places


    प्रतिनिधी

    बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांकरिता आज 19 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. या दोन्ही नगर पंचायतींमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही, तर संग्रामपूरमध्ये प्रहारला एकहाती सत्ता, तर मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे.



    बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीच्या 17 जागासाठी 64 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर संग्रामपूरमध्ये 17 जागांसाठी 67 उमेदवार रिंगणात होते. मोताळा नगर पंचायतीमध्ये 12 काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला याठिकाणी एकहाती सत्ता मिळाली आहे. तर भाजपला खातेही उघडता आले नसून सेनेला 4 जागा आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागलेय.

    संग्रामपूर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 67 उमेदवार निवडणक रिंगणात होते. या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने 12 ठिकाणी विजय मिळवत एक हाती सत्ता मिळविली असून महाविकास आघाडीला 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला याठिकाणीही खाते उघडता आले नाहीय. दोन्ही नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारवेळी राज्यमंत्री बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, नाना पटोलेंसह इतर नेत्यांच्या सभा झाल्या होत्या, प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, आजच्या निकालाचे चित्र काही वेगळेच आहे.

    Buldana One-sided power to Congress in Motala, success of attack in Sangrampur, while BJP lost in both places

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!