वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाविरोधी लसीकरणात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार २.४१ कोटींपेक्षा जास्त लोकांना डोस दिले आहेत. विशेष म्हणजे ४७.८३ लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. Both Doses of the Vaccine to 47 lakh people in Maharashtra; Lead in the country; Dose over 2.41 crores
महाराष्ट्रात २.४१ कोटींपेक्षा जास्त लशीचे डोस दिले असून १.९३ कोटी लोकांना एक डोस दिला आहे. तर ४७.८३ लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
४५ ते ६० वयोगटात दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाला मंजुरी मिळाली. परंतु, या वर्गात सर्वांत जास्त ८४.३३ लाख डोस दिले.
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ६९.४३ लाख आणि १८ ते ४४ वयोगटात ३९.७० लाखांपेक्षा जास्त डोस दिले. ८९.६२ लाख महिलांना लसीचा एक डोस दिला आहे. ६ जूनपर्यंत अशा पुरुषांची संख्या १.०३९ कोटी होती. एकूण लसीकरणात कोविशिल्डच्या २.११ कोटींपेक्षा जास्त डोस दिले आहेत. मात्र २९.५४ लाख कोव्हॅक्सिनचे डोस त्या तुलनेत जास्त आहेत.
३.५० लाख जणांना शनिवारी लस
- राज्यात रविवारी लसीकरणाचा वेग अपेक्षापेक्षा मंद होता. दुपारपर्यंत १६५७ केंद्रांवर फक्त ८१,८०३ मात्रा दिल्या गेल्या. शनिवारी लस घेणाऱ्यांची संख्या ३.४९ लाख होती. त्या दिवशी ३८२२ सरकारी आणि ३४७ खासगीसह एकूण ४१६९ केंद्रांवर लसीकरण केले.
- ३९८ जणांना गंभीर समस्या
- या दरम्यान ३९८ जणांना लस घेतल्यानंतर गंभीर तक्रारी होत्या. राज्यात लसीकरण मोहिमेत हे प्रमाण फक्त.०२१ टक्के आहे.
- मुंबईत सर्वाधिक, हिंगोलीत सगळ्यात कमी
- लासीकरणात मुंबई आघाडीवर आहे. लसीकरण झालेले शहर व कंसात आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (३७.०१ लाख), पुणे (३१.०७ लाख), ठाणे (१८.२० लाख), नागपूर (१३.१७ लाख), कोल्हापूर (१२.०५ लाख), नाशिक (१०.४२ लाख), सातारा ( ७.८३ लाख ), औरंगाबाद (६.२५ लाख), हिंगोली (१.४५ लाख) गडचिरोली (१.७१ लाख) आणि सिंधुदुर्ग (२.२६ लाख )
Both Doses of the Vaccine to 47 lakh people in Maharashtra; Lead in the country; Dose over 2.41 crores
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यामध्ये मॉन्सूनचे जोरदार आगमन : नऊ जिल्ह्यांत शिडकाव्याने वातावरणात गारवा
- स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कोण साकारणार? लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रामध्ये होणार चित्रीकरण
- ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न
- भज्जी तू सुध्दा खलिस्थानवादी! क्रिकेटपटू हरभजनसिंगने केला जर्नलसिंग भिद्रानावलेचा गौरव, शहीद म्हणून केला प्रणाम
- पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, बॉम्ब फेकून केली हत्या
- नात्याला काळिमा, मुलाने केला वृध्द आईवर बलात्कार