Javed Akhtar Defamation Case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती, ती न्यायालयाने फेटाळली. bombay high court dismisses plea of kangana ranaut to quash defamation case by javed akhatar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती, ती न्यायालयाने फेटाळली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर अनेक आरोप केले होते, त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता.
जावेद अख्तर यांचा आरोप आहे की, कंगनाने राष्ट्रीय वाहिनीवर त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. जावेद अख्तर यांनी सुशांतसिंह राजपूतबद्दल दिलेल्या त्यांच्या टीव्ही मुलाखतीचा उल्लेख केला होता.
काय होते प्रकरण?
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगना रनौतने जावेद अख्तर यांचे नाव घेत त्यांच्यावर अनेक आरोप केले. अभिनेत्रीच्या आरोपानंतर जावेद यांनी तिच्यावर कारवाई केली. यानंतर डिसेंबरमध्ये न्यायालयाने जुहू पोलिसांकडून कंगनाच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आणि फेब्रुवारीमध्ये कंगनाला नोटीस बजावली, अहवाल सादर झाल्यानंतर खटल्याची कार्यवाही सुरू केली, त्यानंतर कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वाद बराच वाढला.
यापूर्वीही कंगनाने जामिनासाठी याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी करत न्यायालयाने कंगनाला जामीन मंजूर केला. जावेद अख्तर यांनी एका टीव्ही मुलाखतीत कंगना रनौतवर त्यांच्याविरोधात बदनामीकारक आणि निराधार वक्तव्य केल्याचा आरोप केला होता.
bombay high court dismisses plea of kangana ranaut to quash defamation case by javed akhatar
महत्त्वाच्या बातम्या
- NIRF Rankings 2021 : मिरांडा हाउस बेस्ट कॉलेज, इंजिनिअरिंगमध्ये IIT मद्रास टॉप, शिक्षण मंत्रालयने जारी केली NIRF रँकिंग
- WATCH : पाक सीमेलगतच्या महामार्गावर 2 केंद्रीय मंत्र्यांसह सुपर हर्क्युलसचे थरारक लँडिंग, जॅग्वार आणि सुखोई विमानेही उतरली
- कोरोनाविरोधी लसीचे आणखी एक पाऊल; भारत बायोटेकच्या नाकाद्वारे लसीची चाचणी
- २८ एकरचे ऐतिहासिक शिवाजी पार्क आता दिव्यांच्या रोषणाईत न्हावून निघणार
- कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी तुडुंब प्रतिसाद, रेल्वेने सोडल्या विक्रमी गाड्या