• Download App
    Honey Trap : बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीला मुंबईत अटक, हनी ट्रॅपमधून उकळली कोट्यवधींची रोकड । Bollywood actor wife lubna wazir arrested in honey trap case in mumbai but other models fled away

    हनी ट्रॅपप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीला मुंबईत अटक, बदनामीच्या भीतीने उकळले कोट्यवधी

    हनी ट्रॅपमध्ये अडकवून मोठमोठे उद्योजक, व्यापाऱ्यांकडून लाखोंची खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई गुन्हे शाखेने केलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक महिला फॅशन डिझायनर आहे. ती नव्वदच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी आहे. अभिनेत्याची पत्नी सपना ऊर्फ ​​लुबना वजीरचे तीन साथीदार फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. Bollywood actor wife lubna wazir arrested in honey trap case in mumbai


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हनी ट्रॅपमध्ये अडकवून मोठमोठे उद्योजक, व्यापाऱ्यांकडून लाखोंची खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई गुन्हे शाखेने केलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक महिला फॅशन डिझायनर आहे. ती नव्वदच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी आहे. अभिनेत्याची पत्नी सपना ऊर्फ ​​लुबना वजीरचे तीन साथीदार फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    आरोपी फॅशन डिझायनर लुबना वजीर ऊर्फ ​​सपनाच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात २९ लाखांची रोख रक्कम, 7 मोबाइल, 2 कार आणि आठ लाखांहून अधिक किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

     



    असा आखायची हनी ट्रॅप

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फॅशन डिझायनर लुबना वजीर ही किटी पार्टीजचे आयोजन करते. या कार्यक्रमांतून ती अनेक श्रीमंतांशी मैत्री करते आणि त्यांच्या जवळ येते. यानंतर त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधींना गंडा घालते. या कामात तिची टोळी तिला मदत करते. या टोळीत काही पुरुष आणि काही महिला मॉडेल्सचा समावेश आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून फसवणूक झालेल्यांशी आता पोलीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

    कोल्हापूरच्या उद्योजकाला गंडा

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन वर्षे एका उद्योगपतीचा माग काढून कट रचून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकण्यात आले. कोल्हापुरातील बड्या उद्योगपतीला मुंबईत एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये खोट्या बलात्कार प्रकरणाची धमकी देऊन पद्धतशीरपणे गंडवण्यात आले.

    Bollywood actor wife lubna wazir arrested in honey trap case in mumbai but other models fled away

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!