• Download App
    ‘’जो व्यक्ती वडिलांचा वारसा सांभाळू शकत नाही, त्या व्यक्तीचे...’’; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार!BJPs response to Uddhav Thackerays criticism of Chandrashekhar Bawankule

    ‘’जो व्यक्ती वडिलांचा वारसा सांभाळू शकत नाही, त्या व्यक्तीचे…’’; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार!

    (संग्रहित)

    ‘’घरात बसून पक्ष संपवणाऱ्या व्यक्तीने कर्तव्यनिष्ठ व्यक्तीबद्दल बोलू नये.’’ असंही भाजपाने म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारपरिषदेतून भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना, शिंदे गट आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला होता. ज्यावर आता भाजपाकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. BJPs response to Uddhav Thackerays criticism of Chandrashekhar Bawankule

    ‘’उद्धव ठाकरे एवढा अहंकार बरा नव्हे!  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बोलताना तुम्ही नेहमीच मर्यादा ओलांडली आहे. आम्हाला मोजणारे तुम्ही कोण? तुमचं कर्तृत्व काय? जो व्यक्ती वडिलांचा वारसा सांभाळू शकत नाही, त्या व्यक्तीचे कर्तृत्व काय?’’ असं भाजपाने म्हटलं आहे.


    Video : ”…तेव्हा हेच उद्धव ठाकरे बाळासाहेबांना एकटे सोडून ताज प्रेसिंडेटमध्ये जाऊन लपलेले” नितेश राणेंचं मोठं विधान!


    याशिवाय, ‘’उद्धव ठाकरे, सर्वजण तुमच्या सारखे नसतात वडिलांच्या पुण्याईवर जगणारे. काहीजण असतात संघर्ष करून स्वतःच अस्तित्व निर्माण करणारे. उद्धव ठाकरे, तरुण वयात तुम्ही ‘छंद’ म्हणून फोटोग्राफी करत होता, त्या वयात बावनकुळे प्रकल्पग्रस्त बेरोजगारांसाठीच्या न्यायासाठी लढत होते. उद्धव ठाकरे, तुम्हाला जे काही मिळालं ते स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने. पण, तुम्हाला त्यांच्या संघर्षाची किंमत सुद्धा कळली नाही. जो व्यक्ती स्वतःच्या वडिलांच्या विचारांची प्रतारणा करतो, तो व्यक्ती इतरांचा सन्मान कसा करेल?’’ असा सवालही उद्धव ठाकरेंना भाजपाने केला आहे.

    याचबरोबर, ‘’उद्धव ठाकरे, तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या. चंद्रशेखर बावनकुळे संघटनेसाठी १६ तास कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करतात. उद्धव ठाकरे, तुम्ही जेवढा वेळ घरात झोपा काढता तेवढा वेळ ते काम करतात. घरात बसून पक्ष संपवणाऱ्या व्यक्तीने कर्तव्यनिष्ठ व्यक्तीबद्दल बोलू नये. वैफल्यग्रस्त व्यक्ती आयुष्यात कधीच कर्तृत्वान होऊ शकत नाही. कारण, तो स्वतःच्या नशिबाला कर्तृत्व समजून बसतो आणि उद्धव ठाकरे, तुम्ही वैफल्यग्रस्त आहात. उद्धव ठाकरे, तुमचा पराभव तुमचा अहंकारच करेल. अहंकार एवढा बरा नसतो. कर्तृत्ववान बना नंतर इतरांवर टीका करा.’’ असा टोला देखील भाजपाने उद्ध ठाकरेंना लगावला आहे.

    उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? –

    पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी ‘’भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांनी हिंमत झाली नाही शेवटी निकाल कोर्टाने दिला. मिंधेंना बाळासाहेबांचे शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये.’’

    याचबरोबर, ‘’बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसत ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत?  त्यांच्या कडून येऊ द्या भाजपच्या कार्यालयात सराव सुरु असेल.’’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

    BJPs response to Uddhav Thackerays criticism of Chandrashekhar Bawankule

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा