या देशातील संपूर्ण ओबीसी समाज, तेली समाज हा राहुल गांधींचा निषेध व्यक्त करत आहे, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधींना ‘’सगळेच चोर मोदी आडनावाचे कसे?’’, अशी बदनामीकारक टिपण्णी केल्याबद्दल सुरत कोर्टाने दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि ३० दिवसांसाठी जामीनही दिला गेला. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेसची जोरदार टीका, टिप्प्णी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रकारपरिषद घेत राहुल गांधी व काँग्रेसवर जोरदार टीका केली. BJP will protest all over Maharashtra against Rahul Gandhi Chandrasekhar Bawankule
चंद्रशेखऱ बावनकुळे म्हणाले, ‘’आज राहुल गांधींविरोधात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दोन वर्ष शिक्षेचं प्रावधान केलं गेलं. खरंतर आज संपूर्ण ओबीसी समाज आणि विशेष करून देशातील ओबीसी समाजामधील मोठा तेली समाजातून देशभर, राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींनी मोदींना चोर म्हणून जी टिप्पणी केली होती, आर्वाच्य भाषेत जी टिप्प्णी जेव्हा झाली होती, तेव्हाही आणि खरंतर आता न्यायालयाने जी शिक्षा दिली. या शिक्षेपेक्षाही समजाचा जो मोठा अपमान राहुल गांधींनी केला, तो न्यायालयाच्या निर्णयाने आपल्या समोर आला आहे.’’
याचबरोबर ‘’ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करणारे राहुल गांधी यांच्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा आंदोलन करणार आहे. खरंतर ते इतके निर्लज्ज झाले आहेत की न्यायालायने निकाल दिल्यानंतर, न्यायालय हे दबावाखाली काम करतं अशा अनेक काँग्रेस नेत्यांनी टिप्प्णी केल्या आहेत.’’ असं बावनकुळे म्हणाले.
याशिवाय ‘’पंतप्रधान मोदींना, ओबीसी समाजातीली एका मोठ्या नेत्याला भरसभेत जातीवाचक शिवीगाळ करायची, मागासवर्गीयांचा अपमान करायचा आणि जेव्हा त्यांच्याविरोधात निकाल येतो तेव्हा न्यायालयाचाही अपमान करायचा. जेव्हा काँग्रेसच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ती लोकशाही असते आणि जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा हुकमाशाही होते. तेव्हा सरकारचं दडपण असतं. त्यामुळे या देशातील संपूर्ण ओबीसी समाज, तेली समाज हा राहुल गांधींचा निषेध व्यक्त करत आहे.’’ असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
BJP will protest all over Maharashtra against Rahul Gandhi Chandrasekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!
- माहीमचा अनधिकृत दर्गा तोडा; नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु… राज ठाकरेंचा इशारा
- मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!
- राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!