• Download App
    नारायण राणेंना नारळाची उपमा देऊन चंद्रकांतदादांचा ठाकरे सरकारला सबुरीचा सल्ला; अटकेचे पडसाद उमटण्याचाही दिला इशारा। BJP state president chandrakantdada patil warns thackeray govt over possible arrest of Central minister Narayan Rane

    नारायण राणेंना नारळाची उपमा देऊन चंद्रकांतदादांचा ठाकरे सरकारला सबुरीचा सल्ला; अटकेचे पडसाद उमटण्याचाही दिला इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना अटक करायला निघालेल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. एका पाठोपाठ एक ट्विट करून त्यांनी नारायण राणे यांची बाजू लावून धरली आहे. BJP state president chandrakantdada patil warns thackeray govt over possible arrest of Central minister Narayan Rane

    चंद्रकांतदादा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की नारायण राणे हे नारळासारखे आहेत. वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे. त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? त्यांना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील, याचा विचार सरकारने केलाय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नांदावी ही जबाबदारी लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आशा करतो.



    आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे यांनीही भाषणे केली आहेत. दसरा मेळाव्यातली त्यांची भाषणे काढून पाहा. त्यात वादग्रस्त विधाने आहेत. नीलम गोऱ्हे सभापती असूनही राजकीय वक्तव्ये करतात. त्यांना विचारा की, सभापतीपदाचा राजीनामा दिलाय का? त्यामुळे सामंजस्याने मार्ग काढायला हवा, असे माझे मत आहे.

    नारायण राणे हे आक्रमक नेते म्हणूनच ओळखले जातात. ती त्यांची शैली आहे. प्रत्येकाची एक शैली असतेच. मी त्या शैलीचे समर्थन करत नाही, पण त्यासाठी थेट अटक कितपत योग्य ठरेल? राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत, हे विसरून कसे चालेल? सरकार, प्रशासनाने याविषयी त्यांच्याशी चर्चा करावी, अशी सूचना चंद्रकांतदादांनी ठाकरे सरकारला केली आहे.

    BJP state president chandrakantdada patil warns thackeray govt over possible arrest of Central minister Narayan Rane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस