• Download App
    ‘’हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात, लढत राहू’’ राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; भाजपानेही दिलं प्रत्युत्तरBJP responded to Uddhav Thackerays attack on the central government after Rahul Gandhis candidacy was cancelled

    ‘’हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात, लढत राहू’’ राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; भाजपानेही दिलं प्रत्युत्तर

    (संग्रहित)

    राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावरून उद्धव ठाकरेंनी दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत आणि भाजपाने काय दिलं आहे उत्तर?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मोदी आडनाव असणाऱ्यांना चोर म्हटल्याबद्दल काल गुजरातमधील सुरत कोर्टाने काँग्रेस खासदार राहुल गांधींना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर आज कायदेशीर तरतुदीनुसार लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. म्हणणाऱ्या BJP responded to Uddhav Thackerays attack on the central government after Rahul Gandhis candidacy was cancelled

    अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, तर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका टिप्पणी सुरू आहे. इकडे महाराष्ट्रातही ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यावर भाजपाकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.


    संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…


    ‘’राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर, देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहूल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत, हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे, लढत राहू.’’ असं उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचं ट्वीट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

    ज्यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडून प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.’’राऊत साहेब चोराला चोर म्हणणं गुन्हा ठरला आहे, या आपल्या वाक्यांचा अर्थ ओबीसी समाजाला आपणही म्हणजे उध्दव ठाकरे व संजय राऊत चोर समजतात का? कारण राहुल गांधीयांनी सर्व मोदी चोर असं विधान केल आहे, म्हणून त्यांना शिक्षा झाली. त्याचं समर्थन आपण करत आहात. ओबीसी समाजाचा अपमान आपण करत आहात.’’ असं उपाध्येंनी म्हटलं आहे.

    याशिवाय, ‘’सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै २०१३ रोजी लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यात निकाल दिला. कोणताही खासदार, आमदार एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरला असेल व त्याला किमान २ वर्षांचा तुरुंगवास झाला असेल, तो तत्काळ प्रभावाने सभागृहाचे सदस्यत्व गमावतो. या निकालानुसार राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाले.’’ असंही केशव उपाध्ये यांनी आणखी एका ट्वीटद्वारे सांगितलं आहे.

    BJP responded to Uddhav Thackerays attack on the central government after Rahul Gandhis candidacy was cancelled

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस