उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेतील तिन्ही संसदीय समित्यांचे राजीनामे देऊन शनिवारी (दि. 25) खळबळ उडवून दिली. मात्र त्यांचे हे राजीनामे भाजपा विरोधात नसून महाराष्ट्रातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या सरकारविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. BJP MP Gopal Shetti resigned from all of his parliamentry positions
विशेष प्रतिनिधी
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे श्रद्धास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती शनिवारी देशभरात साजरी होत असतानाच उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली पश्चिम,लोकमान्य नगर येथील त्यांच्या कार्यालयातून फेसबुक लाईव्हवरून मोठी घोषणा केली. यामुळे एकच खळबळ उडाली.
शेट्टी यांनी संसदीय कार्य समिती, रेल्वे समिती आणि गृहनिर्माण समिती या समित्यांचे राजीनामे दिल्याचे जाहीर केले. केंद्रीय समित्यांचा राजीनामा केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठविला असून ते तो मंजूर करतील असे त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर येत्या २६ जानेवारीपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही तर खासदारकीचा सुद्धा राजीनामा देऊ असा इशारा त्यांनी दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून खासदार शेट्टी हे झोपडपट्टी पुनर्वसन आणि गोरगरिबांना पक्की घरे लवकरात लवकर मिळावीत यासाठी झटत आहेत. सन २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नवीन संशोधित कायदा केला. परंतू त्याची अंमलबजावणी आजपर्यंत होऊ शकलेली नाही.
सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच मानव अधिकार आयोगापर्यंत त्यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. मात्र तरीही फडणवीस सरकारने केलेल्या २०१७ च्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प रेंगाळले आहेत.
झोपडपट्टीवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार शेट्टी यांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या २०१७च्या कायद्याला अद्याप मंजूरी मिळाली नसल्याची टीका त्यांनी केली.
फेसबुक लाईव्हवर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशासाठी मोठे कार्य केले. आपल्याही पदाचा उपयोग नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झाला पाहिजे असे आपल्याला वाटते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी प्राण गमावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्न मार्गी लावला. सन २०२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे मिळावीत हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्यासाठी माझा संघर्ष चालू आहे.
BJP MP Gopal Shetti resigned from all
महत्त्वाच्या बातम्या
- टक्केवारीच्या फुगड्या खेळणारे मुलांनाच आमदार-खासदार करणार; बहुजनांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का? ; गोपीचंद पडळकर यांचा परखड सवाल
- पालघरमधील प्रकार, दलितांच्या अंतयात्रेच्या वेळी गोंधळ करणाऱ्या तीन लोकांना अटक
- तालिबान इम्रान खानला म्हणाला कठपुतळी , अफगाणिस्तान प्रकरणापासून दूर राहण्याचा दिला सल्ला
- UNGA मधील मोदींचे संपूर्ण भाषण : संयुक्त राष्ट्रांत पंतप्रधानांनी दहशतवाद, कोरोना आणि अफगाणिस्तानसह या मुद्द्यांवर मांडले मत! वाचा सविस्तर…