• Download App
    ‘’महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी "उबाठा" आता काय वगळणार, काँग्रेस की सावरकर?’’ BJP MLA Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray and Congress

    ‘’महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी “उबाठा” आता काय वगळणार, काँग्रेस की सावरकर?’’

    आशिष शेलारांचा सवाल; काँग्रेसवरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी विचारांना तिलांजली देत आहे. कर्नाटक मधल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विचारसरणीचा साधा अभ्यास देखील करू नये यासाठी काँग्रेस सरकारने चंग बांधला आहे. त्यामुळेच सिद्धरामय्या यांच्या सरकारने कर्नाटक मधल्या अभ्यासक्रमांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळले आहेत. यावरून आता भाजपाही आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. BJP MLA Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray and Congress

    आशिष शेलार म्हणतात, ‘’स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या कार्नाटक सरकारच्या तुघलकी निर्णयाचा आम्ही निषेध करतो!’’

    याचबरोबर ‘’अरे, बेक्कल काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान सुपुत्रांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळालही पण जनतेच्या मनातून आणि इतिहासाच्या पानातून त्यांचे महान कार्य कधीच वगळू शकणार नाही! महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी “उबाठा” आता काय वगळणार, काँग्रेस की सावरकर?’’ असा सवालही आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

    याशिवाय, ‘’काँग्रेसच्या असल्या ६० वर्षांच्या कारभाराला कंटाळून जनतेने त्यांना देशातूनच वगळून टाकायचे ठरवलेय! तर काँग्रेसला साथ देणाऱ्या “उबाठा”ला आमदारांनी शिवसेनेतून वगळलेच आता महाराष्ट्रातील जनताही लवकरच उबाठा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवक्त्यांना धडा शिकवेल!’’ अशा शब्दांमध्ये शेलारांनी टीका केली आहे.

    BJP MLA Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray and Congress

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!