प्रतिनिधी
मुंबई : विरोधकांना महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचाराच दिसतो. आरशात बघितले तरी भ्रष्टाचार दिसेल… आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये!! पण भाजपकडे ह्युमन लॉन्ड्री आहे. नितीन गडकरी म्हणाले होते, भाजपमध्ये वाल्याचा वाल्मिकी होतो म्हणजे भाजप मध्ये गेले की भ्रष्टाचार साफ होतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपच्या आरोपांचा समाचार घेतला. त्याच वेळी त्यांनी हिंमत असेल तर मर्दासारखे समोरून लढा. कुटुंबीयांना त्रास देऊ नका. तुम्ही तुरुंगात टाकले तरी मी घाबरत नाही, असे आव्हान भाजपला दिले. ईडी काय भाजपचे घरगडी आहे का?, असा सवाल देखील त्यांनी केला.BJP has human laundry, they have gone to clean corruption
मुख्यमंत्र्यांच्या आव्हानात्मक भाषणातले मुद्दे :
राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना, शिवसेना नेत्यांना त्रास दिला जात आहे. सत्ता मिळाली नाही म्हणून आता घरच्यांनाही सोडले जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणाच्या मागून कुटुंबीयांना त्रास देण्यात येत आहे.
तुमच्यात जर हिंमत असेल तर मला टाका तुरुंगात. मी घाबरत नाही तुरुंगात जायला.
रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. देशात सत्ता आली तरी काहींचा जीव मुंबईत दिसतो.
ईडी आहे की घरगडी? सत्तेसाठी उगाचच कुणाचे नाव खराब करू नका, कुटुंबीयांची बदनामी कशासाठी? हवे तर मला तुरूंगात टाका. शिवैनिकांची जबाबदारी मी घेतो.
कोरोनामध्ये सर्व कामं ही टेंडर काढूनच केली. सुपर मार्केटमध्ये मद्यविक्री करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यावर हरकती मागवल्या आहेत. अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
महाविकास आघाडी सरकारने चांगली कामे केली आहेत. ही कामे सांगण्याआधीच राज्यपालांनी अभिभाषण मध्येच सोडून गेले. मला एका गोष्टीचे दुःख आहे की, राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. याचे महत्त्व आमच्यापेक्षा विरोधकांना जास्त माहिती आहे. पण दुर्देवाने प्रथा परंपरा पाळल्या नाहीत.
सरकारचा दाऊदशी संबंध जोडला जातो. मात्र, दाऊद कोठे राहतो, हे कोणालाच माहिती नाही. त्याचा ठाव ठिकाणा माहिती नाही. केवळ आरोप करुन भ्रम निर्माण केला जात आहे. दाऊदचा उल्लेख आपण संपूर्ण अधिवेशनभर करत आलेला आहात. देंवेद्र फडणवीसांनी सांगितलेल्या कवितेप्रमाणे तेच ते आणि तेच ते तुम्ही केले.
नवाब मलिक किती वेळा निवडून आलेत. त्यावेळी त्यांचा संबंध नव्हता का? आधी गोपीनाथ मुंडे असताना त्यांनी जाहीर केले होते. दाऊदला फरफट आणू, पुढे काय झाले? आधी राम मंदिरचा मुद्दा होता. त्यावर मत मागितली निवडणुकीत आता दाऊद दिसतो का?
राज्य सरकारबद्दल आपण हक्काने राज्यपालांकडे तक्रारी नोंदवता. पण राज्याचे सरकार हे काय करत आहे, याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्या समोर मांडत असतात. राज्यपालांना राष्ट्रगीतालाही थांबू दिले गेले नाही. त्यामुळे एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल.
BJP has human laundry, they have gone to clean corruption
महत्त्वाच्या बातम्या
- SONU NIGAM : महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या भावाकडून सोनू निगमला धमकी ! आयुक्तांनीच करून दिली होती ओळख …
- काश्मिरी पंडितांची पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव, 1990च्या नरसंहाराची पुन्हा चौकशी करण्याची मागणी
- Yogi Adityanath : योगी मंत्रिमंडळात ब्रजेश पाठक उपमुख्यमंत्री, स्वतंत्र देव सिंग मंत्री; डॉ. दिनेश शर्मांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी??
- मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते; नीतेश राणे यांचा खळबळजनक आरोप