• Download App
    भाजपने शिवसेनेला कधीही अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासाBJP had never promised Shiv Sena the chief ministership for two and a half years; Chief Minister Eknath Shinde's disclosure

    भाजपने शिवसेनेला कधीही अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

     

    प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरेंना दिले नव्हते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला. याप्रकरणी शिंदेंनी ठाकरेंना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला.BJP had never promised Shiv Sena the chief ministership for two and a half years; Chief Minister Eknath Shinde’s disclosure

    शिंदे म्हणाले की,‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली तेव्हा त्यांना विचारले की, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन खरेच बंद दारात दिले होते का? यावर ते (मोदी-शहा) म्हणाले की, बिहारमध्ये नितीश कुमारांचे आमदार कमी असूनही भाजप त्यांना मुख्यमंत्री बनवू शकते. तुमच्याकडे ५० आमदार आणि आमचे १०६ आमदार असूनही आम्ही तुम्हाला (शिंदे) मुख्यमंत्री बनवू शकतो. त्यामुळे ठाकरेंना आम्ही वचन दिले असते तर ते नक्कीच पूर्ण केले असते. महाविकास आघाडीत असताना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असे राष्ट्रवादी उघडपणे सांगत होती.


    Eknath Shinde Vs Sanjay Raut : एकनाथ शिंदे म्हणाले- दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्यांना शिवसेना पाठीशी कशी घालणार?


    शिवसैनिक असल्यामुळे मुख्यमंत्री

    शिंदे यांनी सांगितले की, भाजपचे १६० आणि माझे ५० आमदार असतानाही मला मुख्यमंत्री का करण्यात आले? हा प्रश्न लोक अनेकदा विचारतात. पण यासाठी मी कोणतेही वशिकरण केले नाही. परिस्थितीनुसार समीकरण बदलत राहतात. मला मुख्यमंत्री करून भाजपने आपले मोठेपण सिद्ध केले आहे. सत्ता मिळवण्यासाठी आणि आपला मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप काहीही करू शकतो, असा भाजपबद्दल लोकांमध्ये समज होता. उलट भाजपने एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले.

    पुन्हा ठाकरेंसोबत जाणार नाही

    भविष्यात पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याची ऑफर आली तर आपण उद्धव यांच्या शिवसेनेसोबत जाणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही बाळासाहेबांच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब म्हणायचे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीच शिवसेनेचे मित्र होऊ शकत नाहीत. हे दोन्ही पक्ष शिवसेनेचे शत्रू आहेत. या पक्षांसोबत कधी युती करण्याची संधी आली तर मी माझी दुकान बंद करेन. त्यामुळे मी यापुढे ठाकरेंसोबत जाणार नाही, असेही ते म्हणाले.

    संपर्कात आजही अनेक आमदार

    महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका होणार आहेत. या शरद पवार यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, प्रत्येक पक्षाची रणनीती असते. आपल्या पक्षाच्या आमदारांनी दुसऱ्या पक्षात जाऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. सत्तेतील आणि विरोधातील अशा दोन्ही पक्षांना आपापले आमदार सांभाळावे लागतात. आजही माझ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात अनेक आमदार आहेत. पण आम्हाला त्यांची गरज नाही, असेही ते म्हणाले.

    मी पक्षातून बाहेर रात्रीच्या अंधारात नाही तर उजेडात बाहेर पडलो. त्या दिवशी विधान भवनात मतदान करून तिथून निघालो. यावेळी माझा मोबाइल चालू होता आणि मीही सर्वांशी चर्चा करत होतो. सूरतला मला फोन येत होते आणि मी त्यांच्याशी बोलत होतो. आमदारांना देखील फोन येत होते. तेव्हा मी त्यांना सांगितले की, तुम्ही फोनला उत्तर देऊ शकत नाही, त्यामुळे तो बंद करा. मात्र, माझा मोबाइल सुरू होता, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
    सुरतला माझा मोबाइल चालू होता

    BJP had never promised Shiv Sena the chief ministership for two and a half years; Chief Minister Eknath Shinde’s disclosure

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!