प्रतिनिधी
बारामती/ मुंबई : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढले. राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करून ते सरकार बनवत आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय जुगलबंदी झाली आहे. भाजप आपल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवतो. BJP ends friendly parties Pawar attack Pawar sadness that he could not sustain the government
पंजाब मधले अकाली दल आणि महाराष्ट्रातली शिवसेना ती त्याची उदाहरणे आहेत, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी भाजप वर शरसंधान साधले आहे, तर पवारांचे महाराष्ट्रातले दुःख वेगळे आहे. त्यांना शिवसेना आपल्या समवेत टिकवता आली नाही, महाराष्ट्रात त्यांचे सरकार टिकले नाही हे ते दुःख आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करून पलटवार केला आहे.
भाजप त्यांच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवत आहेत, असे टीकास्त्र शरद पवार यांनी बारामतीतून सोडले. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले शरद पवारांचे दुःख थोडे वेगळे आहे. ते सर्वांना माहिती आहे.
फडणवीस यांचे उत्तर
आमचा जो मित्र पक्ष आहे त्यांच्या सोबत ५० लोकं आहेत. आम्ही ११५ लोकं असून मित्रपक्षाला आम्ही मुख्यमंत्री पद दिले आहे. मंगळवारी त्यांचे नऊ आणि आमचे नऊ अशा एकूण १८ जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पवार साहेबांचे दुःख जरा वेगळं आहे, असे मला वाटते.
यासह पुढे पक्ष चिन्हावरील वादाच्या पवारांच्या वक्तव्यावर फडणीस म्हणाले, ज्यावेळी पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते. त्यावेळी अँटी डिफेक्शनचे कायदे नव्हते. त्यामुळे कोणालाही कसाही पक्ष बदलता येत होता. मात्र आज यासंदर्भातील कायदे तयार झाले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते. यासर्वावर शिंदे कायदेशीर लढाई करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवार यांचे वक्तव्य
भाजप त्यांच्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो असे वक्यव्य शरद पवारांनी केले आहे, तर वेळीच सावध होत नितीश कुमारांनी शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेवरही भाजपने आघात केला. भाजप मित्रपक्षांना दगा देतो हीच नितीश कुमारांची देखील तक्रार होती. नितीश कुमार यांनी भाजपसोबत घेतलेल्या काडीमोडवर पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
BJP ends friendly parties Pawar attack Pawar sadness that he could not sustain the government
महत्वाच्या बातम्या
- कॅगच्या अहवालात ठपका : टाटा कम्युनिकेशन्स कंपनीने सरकारची केली 645 कोटींची फसवणूक
- द फोकस एक्सप्लेनर : चिप उत्पादनात चीनची एकाधिकारशाही मोडणार अमेरिका, 200 अब्ज डॉलर्सचे बिल, जगावर काय परिणाम? वाचा सविस्तर…
- बिहारमध्ये पुन्हा चाचा-भतीजा सरकार : आज नितीश-तेजस्वी घेणार शपथ, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युलाही निश्चित
- PM मोदींकडे ₹2.23 कोटींची संपत्ती : गतवर्षीच्या तुलनेत ₹26.13 लाखांची वाढ; ₹ 1 कोटी किमतीची जमीन दानही केली