• Download App
    भाजपचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीच्या शिबिरात; पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनाला भेट ; राष्ट्रवादी काँग्रेस भवनाला स्नेहभेट|BJP delegation at NCP camp

    WATCH : भाजपचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीच्या शिबिरात; पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनाला भेट ; राष्ट्रवादी काँग्रेस भवनाला स्नेहभेट

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. राजकारण वेगळे आणि त्यातील स्नेहभाव वेगळा. याची झलक आज पहायला मिळाली. पुण्यातील भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसने उभारलेल्या नूतन कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते.BJP delegation at NCP camp

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे पुणे पालिकेमध्ये कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. एरवी एकमेकांवर टीका,टिप्पणी करणारे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात भेटले.



    या वेळी भाजपचे खासदार गिरीश बापट , शहराध्यक्ष जगदीश मुळीक,योगेश टिळेकर,सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप , राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.

    • भाजप शिष्टमंडळाची राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट
    •  पुण्यातील नूतन राष्ट्रवादी काँग्रेस भवनची पाहणी
    • खासदार बापट यांच्यासह नेते, कार्यकर्ते शिष्टमंडळात
    •  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांच्याकडून स्वागत

    BJP delegation at NCP camp

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !