• Download App
    एमआयएमला बी टीम बनविल्याचा आरोप भाजपवर; खा. इम्तियाज जलीलांची ऑफर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना!!|BJP accused of making MIM B team; Eat. Imtiaz Jalil's offer to Shiv Sena CM !!

    एमआयएमला बी टीम बनविल्याचा आरोप भाजपवर; खा. इम्तियाज जलीलांची ऑफर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना!!

    प्रतिनिधी

    संभाजीनगर : एमआयएम पक्षाला भाजपने आपली बी टीम बनवून बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण या निवडणुकीत वापरल्याचा आरोप शिवसेनेसह अन्य पक्ष नेहमी करतात, पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर मधील सभेतील भाषणातून एमआयएमला टीकेच्या हलक्या चापट्या मारल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खुश होऊन मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत मतदानाची ऑफर देऊन टाकली आहे.BJP accused of making MIM B team; Eat. Imtiaz Jalil’s offer to Shiv Sena CM !!

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत शहराच्या नामांतराचा बॉल विमानतळ नामांतर मुद्द्याच्या अडून केंद्र सरकारच्या कोर्टात टाकून दिला. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मूळ प्रश्नाला बगल दिली. शिवाय भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांविषयीच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. या दोन मुद्द्यांवर खुश होऊन इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना काही अटी शर्तींवर राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याची ऑफर दिली आहे.



    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत दर दोन दिवसाआड एमआयएम पक्ष आणि मनसे यांना भाजपने बी टीम बनविल्याचा आरोप करत असतात. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरच्या सभेत या दोन्ही पक्षांवर जपून हलकेच टीकेच्या चापट्या मारल्यानंतर त्यापैकी पहिला प्रतिसाद एमआयएमने दिला आहे. भाजपची बी टीम असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे विसरून गेले आहेत. मनसेच्या ऑफरची शिवसेनेला प्रतीक्षा आहे.

    BJP accused of making MIM B team; Eat. Imtiaz Jalil’s offer to Shiv Sena CM !!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!