वृत्तसंस्था
बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या भाजपचे नवनिर्वाचित मंत्र्यांची आजपासून जन आशीर्वाद यात्रा सोमवारी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार हे विविध मतदारसंघात आपली जन आशीर्वाद यात्रा करत आहेत. Bhagwat Karad’s Jan Ashirwad Yatra starts from Gopinath Fort, involving Pankaja Munde, pritam Munde
मंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात गोपीनाथ गडावरुन झाली आहे. यावेळी गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्रीय मंत्री भागवत कराड हे जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले. या वेळी त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे सुद्धा उपस्थित होत्या. याच दरम्यान पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी पंकजा मुंडे यांनी समर्थकांची खरडपट्टी सुद्धा काढली मात्र, तरीही मुंडे समर्थकांनी आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या. प्रचंड गदारोळात यात्रेला शेवटी सुरवात झाली. पंकजा मुंडे यांनी जन आशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवला आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.
Bhagwat Karad’s Jan Ashirwad Yatra starts from Gopinath Fort, involving Pankaja Munde, pritam Munde
महत्त्वाच्या बातम्या
- पाच हजार दहशतवाद्यांची काबूलच्या तुरुंगातून सुटका; तालिबानचे अफगाणिस्तावर वर्चस्व
- बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका
- तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले
- डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले