• Download App
    परतीच्या पावसामुळे कांद्याच्या किंमतीत वाढ? | Because of heavy rainfall onion prices will raise?

    परतीच्या पावसामुळे कांद्याच्या किंमतीत वाढ?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नवीन हळवी कांद्याचे पीक साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या आसपास मिळते. पण अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये देखील परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये येणारे पीक आता काही दिवसांनी मिळणार आहे. याचदरम्यान सध्या असलेल्या कांद्याला देशभरातून मागणी वाढल्यामुळे बाजारामध्ये कांद्याचे भाव यावर्षी वाढणार असून ही किंमत 50 ते 60 रुपये पर किलो इथेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नवीन कांद्याचे पीक हाती येण्यास काही कालावधी जाणार आहे अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे.

    Because of heavy rainfall onion prices will raise?

    देशभरातून कांद्यासाठी वाढलेल्या मागणीमुळे सध्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक अपुरी आहे. साठवणुकीतील कांद्याच्या प्रतवारी वर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे फक्त चांगल्या प्रीतीच्या जुन्या कांद्याला दर मिळाले आहेत. अशी माहिती पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी नितेश पोमण यांनी दिली आहे.


    सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये कांदा पुन्हा डोळ्यात पाणी आणणार, क्रिसिलच्या अहवालात अनियमित मान्सूनचे कारण


    तर प्रतवारीनुसार एक किलो कांद्याची किंमत 50 ते 60 रुपये या दराने केली जात असल्याचे बाजारातील इतर भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले आहे. तर मुंबईत हाच कांदा घाऊक बाजारामध्ये कांद्याला प्रतवारीनुसार 30 ते 45 रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला आहे. मुंबई, ठाणे व इतर किरकोळ उपनगरामध्ये बाजारात एक किलो कांद्याची विक्री 50 ते 55 रुपये दराने केली जात आहे. नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी 100 गाड्यांमधून कांदे पुरवले जातात तर पुणे मार्केट यार्डातील बाजारात दररोज साधारणपणे 50 गाड्यांमधून कांदे पुरवले जातात.

    Because of heavy rainfall onion prices will raise?

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold Price : सोने तब्बल 1,029 रुपयांनी वाढून 1.11 लाखांच्या सर्वोच्च पातळीवर; चांदीचाही प्रति किलो ₹1.29 लाखांचा विक्रमी उच्चांक

    Pratap Sarnaik : शेतकऱ्यांच्या मुलांची पिळवणूक करणाऱ्या कला केंद्रांचे परवाने तात्काळ रद्द करा

    Beed railways : बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न साकार; उद्या पहिली रेल्वे धावणार, मराठवाड्याच्या विकासाला चालना